मुंबई : गेल्या आठवडाभरापूर्वी भाजप शिवसेना संबधाविषयी सकारात्मक वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज आक्रमक पवित्रा घेत थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज्यात पाठीत खंजीर खुपसणारा एक चेहरा होता आता मात्र दुसरा चेहराही समोर येतोय तो कोणाचा ? उध्दव ठाकरेंचा असा सवाल पाटील यांनी केला.

चंद्रकांत पाटील यांनी भाषणादरम्यान कार्यकत्यांना प्रश्न विचारले. आतापर्यंत पाठीत खंजीर खुपसला असं म्हटलं तर एकच चेहरा समोर याचचा, तो कोणाचा?, त्यावर उपस्थितांनी शरद पवार असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा समोर येतो, तो कोणाचा?, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर उपस्थितांपैकी काहींनी उद्धव ठाकरेंचा असे म्हटले. त्याला चंद्रकांत पाटील यांनी दुजोरा दिला. यांचे नाव मोठे आणि लक्षण खोटे असे आहे. मोदी यांच्या जीवावर निवडून यायचे आणि त्यांच्यावरच टीका करायची असा यांचा कार्यक्रम असल्याचेही पाटील यांनी टीका केली. भाजप आता स्वबळावर सर्व निवडणुका लढवेल आणि एकट्याच्या जीवावर सत्ता आणेल असे चंद्रकांत पाटील म्हणाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!