मुंबई – पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्या मुळे अजित पवार नाराज होतील. तिन्ही पक्षाच्या अंतर्गत वाद ; बंडाळी मुळे महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचे काही खरे नाही. श्रीगणेश विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

बांद्रा येथील त्यांच्या संविधान निवासस्थानी ‘आय विटनेस ब्युरो’ या पोलीस आणि नागरिकांना उपयुक्त वेबसाईट चे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी वक्तव्य केले. यावेळी रिपाइं चे ज्येष्ठ नेते आनंदराव साळवे; आय विटनेस ब्युरो वेबसाईट चे प्रमुख अरुण बाबुराव गवळी; वैभव साळवे; प्रविण प्रधान; रितेश माळवे उपस्थित होते.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी

बॉलिवूड मधील निर्माते दिग्दर्शक कलाकार चांगले असले तरी काही प्रमाणात कलाकारांवर अन्याय होतो.अमिताभ बच्चन सारख्या कलाकाराला ही सुरुवातीला प्रचंड संघर्ष करावा लागला त्यानंतर ते बिग बी झाले. त्यामुळे सुशांत सिंह या कलाकारावर अन्याय झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अभिनेता सुशांत सिंह रजपूत
च्या आत्महत्येची चौकशी सीबीआय द्वारे झाली पाहिजे. अशी आम्ही मागणी केली होती.मुंबई पोलीसांचा जगात नावलौकिक आहे. त्या तुलनेत सुशांत सिंह च्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास वेगवान झालेला नाही. त्यामुळे पार्थ पवार यांनी या प्रकरणी सी बी आय चौकशी ची केलेली मागणी रास्त आहे. या पूर्वीही अनेक प्रकरणी सीबीआय चौकशी ची मागणी करण्यात आली आहे.त्याचा अर्थ आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही असा होत नाही.मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. पण एखादे प्रकरण सीबीआय चौकशी साठी द्यावे ही मागणी करणे म्हणजे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविणे असा होत नाही.त्यामुळे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे असे रामदास आठवले म्हणाले.

तिन्ही पक्षात अंतर्गत वाद

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षात अंतर्गत वाद आहेत. पार्थ पवार बाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार ही नाराज झाले आहेत.तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार चे लवकरच विसर्जन होईल अशी शक्यता निर्माण झाल्याने महाविकास आघाडी च्या कंपूत भीती आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याआधी केंद्र सरकार पडेल असें असबंध विधान केले. सामना वृत्तपत्र चालविणे सोपे आहे मात्र नरेंद्र मोदींशी सामना करणे त्यांना जमणार नाही. केंद्रातील मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार मजबूत बहुमत असणारे सरकार आहे. या सरकार ला 2024 पर्यंत धोका नाही तसेच 2024 च्या ही निवडणुका मोदी सरकार जिंकेल असा विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

*****

       


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!