मुंबई – कुर्ला येथील कामगार नगरमध्ये मर्जी संघटनेमार्फत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुर्ला पुर्व कामगार नगर येथील मर्जी संघटनेच्या केंद्रीय कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचनाने झाली.
आपलं संविधान यावर मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ रोहिदास मुंडे, डॉ हणमंत वानोले यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीती ब्राईट फ्युचर संस्थेचे प्रमुख किशोर पालवे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पाखरे हे आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमात मर्जी संघटनेचे प्रमुख मंगेश सोनावणे , संतोष वाघमारे यांनी संघटनेमार्फत मतदाता जागृती अभियानाची पत्रक वाटून मान्यवरांच्या हस्ते संघटनेच्या अभियानाची घोषणा केली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संघटनेच्या प्रवक्त्या अनुजा तिवारी यांनी केले. विधी शाखेची विद्यार्थिनी वैष्णवी कदम, युवा कार्यकर्ते तुषार ढिवरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. भारतीय संविधान चिराऊ होवो, जय भारत, जय संविधान ,डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.