डोंबिवली ; करोना महामारीच्या संकटात अवघे विश्व भयभीत झाले आहे. यावेळी डॉक्टर. परिचारिका. वार्डबाँय .रूग्णवाहिका चालक पोलिस .सफाई कामगार. राज्य परिवहन सेवाचालक इ.देवमाणसांनी मोलाचे योगदान दिले आणि अजूनही देत आहेत. म्हणूनच ज्या बांधवांनी आपले रक्षण केले. त्यांच्या प्रति माणुसकीच्या नात्याने कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्यच आहे. आणि हीच माणुसकीची जाणीव ठेवून इनरव्हिल क्लब आँफ डोंबिवली ईस्ट या संस्थेने राखीपौर्णिमेचे औचित्य साधून कृतज्ञता व्यक्त केली
इनरव्हिल क्लबच्या अध्यक्ष रोहिणी लोकरे आणि सेक्रेटरी पूनम बोबडे यांनी महत्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले होते. डोंबिवली जिमखान्यातील केडीएमसी संचालित कोविड समर्पित रूग्णालयातील डॉक्टर. परिचारिका. वार्डबाँय. इ.देवदूतांना रोहिणी लोकरे व पूनम बोबडे यांनी राख्या बांधून मिठाई दिली तसेच प्रत्येकाला हॅंड वॅाश देवून रोहिणी लोकरे यांनी या देवदूतांबदल कृतज्ञता व्यक्त करून इनरव्हिलच्या सेवाकार्याची माहिती दिली.. त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलिस बांधवांना राख्या बांधल्या. व मिठाई दिली. पोलीसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता करोना संकटात जे काम केले अजूनही करीत आहेत. त्या कामाला इनरव्हिलतर्फे सलाम केला..आणि हे आगळेवेगळे कृतज्ञ.रक्षाबंधन त्यांच्या समवेत साजरे केले..