मुंबई (अजय निक्ते ) : प्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती ला लुक आऊट नोटीस देण्यात आली आहे. सुशांत सिंग प्रकरणात ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, तिचे अनेक चाहते आहेत.
अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या विरोधात सीबीआयकडून ‘लूक आऊट’ नोटीस काढण्यात आली आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआयची चौकशी सुरू असताना ही नोटीस काढण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीवर सुशांत सिंग राजपूतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सीबीआयने या प्रकरणात रिया व तिच्या कुटुंबातील सदस्यांच्याही चौकशी केली आहे. चौकशीत रियाच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर सीबीआयने ही नोटीस काढली असल्याचे सांगितले जात आहे.
राज्य सरकारने दिशा सालीयन प्रकरणात एस आय टी स्थापन केल्यानंतर आता रिया चक्रवर्ती ला बजावण्यात आलेल्या लूक आऊट नोटीस मुळे बॉलिवूड मध्ये अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *