मंगेश तरोळे-पाटील
मुंबई : आदिवासी महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्यासाठी आदिवासी महादेव कोळी समाजाच्या वतीने आदिवासी विभागीय कार्यालय, अमरावती येथे गेले १४ दिवस उपोषण सुरू आहे. राज्य शासनाने या उपोषणाकडे पाठ फिरवल्याने उपोषणकर्ते राजेंद्र जुवार व गजानन चुनकीकर यांची प्रकृती खालावली आहे. या उपोषणाची या उपोषणाची तातडीने दखल घ्यावी अशी माहिती वजा मागणी बेरार अभ्यासक प्रकाश पाटील फुकट, सावंतवाडी यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात आदिवासी कोळी महादेव समाजाचे उगम स्थान असलेले सातपुडा पर्वंत रांगेतून सहयाद्री पर्वंत रांगेपर्यत पूर्वीपासून आदिवासी महादेव कोळी समाज अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, जळगाव,नाशिक धुळे नंदूरबार सारख्या ठिकाणी व्यवसाय रोजी रोटी भटकंती करत वेगवेगळया जिल्हयात बसला. मात्र, शासन दरबारी मुळच्या सातपुडा पायथ्याशी आदिवासी कोळी महादेव जमात निजाम कालीन वऱ्हाड/बेरार प्रांतात नोंदी असतांना देखील महादेव कोळी समाजाला आदिवासी असल्याचे पुरावे देवून सिद्ध करावे लागत असेल तर आजच्या डिजीटल इंडिया सरकारचे अस्तित्व काय? असा प्रश्न आदिवासी महादेव कोळी समाजाच्या तरूण आणि तरूणींना पडला आहे. खरंच तंत्रज्ञानाच्या या युगात भारत आज देशात ब्रिटनला मागे सरून चौथ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. माननिय पंतप्रधान यांच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाशी सज्ज अशा बलाढय भारत देशात कोळी समाज देशभरात मोठया प्रमाणात आहे. तसा कोळी समाजाचा व्यावसाय मासेमारी, मासे विक्रेत डिजीटल इंडियाच्या सरकारच्या धोरणाचे स्वागत करत डिजीटल इंडिया अंगिकृत करून बसला. आजच्या घडीला संपूर्ण मराष्ट्रातील विदर्भ, खान्देश, मराठवाडा आणि मुंबईतील कोळी समाज डिजीटल इंडियाचे स्वप्न्ा अंगिकृत करून जीवन जगत आहे. मात्र अशा या डिजीटल तंत्रज्ञान युगात जात प्रमाणपत्रासाठी उपोषण करून आमची जात आदिवासी महादेव कोळी असल्याचे सिद्ध करायचे असेल तर डिजीटल तंत्रज्ञान, आधुनिक युग, डिजीट क्रांती म्हणून कसे आदिवासी महादेव कोळी यांनी स्विकार करावे का?
अमरावती विभागीय कार्यालय येथे आमरण अन्नत्याग उपोषणाला बसलेले राजेंद्र उर्फ बाबा जुवार, गजानन चुनकीकर येथे बसलेले विशाल बगाडे गेले १४ दिवस परिवार वाऱ्यावर सोडून आदिवासी कोळी महादेव समाजाला जात प्रमाणपत्र व वैद्यता मिळविण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत. गेले १४ दिवस उपोषणाला बसलेले राजेंद्र जुवार यांना मधुमेहसारखा आजार असतांना राजेंद्र जुवार यांची प्रकृत खालावली असून शासन आदिवासी कोळी समाजाच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती मिराताई कोलटके यांनी दिली.