कार्गोतील कामगारांच्या पगारवाढीचा करार
घाटकोपर ( निलेश मोरे ) मुंबईतील विमानतळावरील कार्गो विभागात सेवा पुरवणाऱ्या सिक्वेल वन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधील कामगारांना एक वर्षाचा पगारवाढ करार करण्यात आला असून एप्रिल 2018 पासून या कंपनीमधील कामगारांना 2500 रुपये पगारवाढ करारानुसार देण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार सुधाकर देशमुख यांनी सांगितले . गेल्या दोन वर्षांपासून कार्गो विभागात काम करणाऱ्या 150 कामगारांनी आपल्या वेतनात पगारवाढ करार व्हावा यासाठी आपली मागणी उचलून धरली होती . भाजप प्रणित राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी कामगारासह आज दिनांक 9 ऑक्टोबर रोजी मुंबई विमानतळावरील कार्गोचे आस्थापना डायरेक्टर यांची भेट घेऊन कामगारांचे प्रश्न शिष्टमंडळा समोर मांडून कंपनीने दिवाळी पूर्वीच कामगारांची मागणी मान्य करून एप्रिल 2018 पासून कामगारांना 2500 रुपये पगारवाढ करार करण्यात आला आहे . यावेळी संघटनेचे सरचिटणीस बलबीर नेगी , खजिनदार अभिषेक राऊत , चिटणीस दिपक कादळगावकर , पोपट बेदरकर , हाजी युनूस शाह आदी उपस्थित होते .