आयुष्यभर आपण मध्यम वर्गीय चौकटीतले आयुष्य जगतो. एड्सग्रस्त, कर्करोगग्रस्त, बालकांचे लैंगिक शोषण, स्त्रीयावरील अत्याचार, वृद्ध लोकांवरील अत्याचार आणि अनेक इतर सामाजिक समस्यांबद्दल आपण वृत्तपत्रातून वाचतो व विसरूनही जातो. पण समाजकार्याच्या अभ्यासक्रमामुळे आपल्याला समाजातील अनेक समस्यांची जाणीव होते. ह्या सगळ्या अडचणींना कसा आळा घालायचा आणि त्यावर कशी मात करायची, हे हि आपल्याला शिकायला मिळते. प्रत्येकाच्या मनात माणुसकीचा मळा असतोच आणि या अभ्यासक्रमासारख्या अनेक प्रकल्पांच्या सिंचनातून हा मळा बहरतो आणि त्याचे कृतीत रुपांतर होण्यास मदत होते. ह्या सगळ्यातून स्वतःचा सर्वांगीण विकास होण्यासही मदत होते.


समाजासाठी काहीतरी करायची आंतरिक प्रेरणा प्रत्येक व्यक्तीत असते. समाजाच्या उन्नत्तीसाठी समाजसेवक उपलब्ध करून देण्याचे कार्य मुंबईतील एक नामवंत संस्था म्हणजे ‘निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय (स्वायत्त)’ करीत आहे. समाजकार्याचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. समताधिष्टीत व सामाजीक न्यायधिष्टीत समाजाची उभारणी करण्यामध्ये योगदान करण्याच्या उद्देशाने निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय सन १९५५ पासून समाजकार्यामध्ये उच्च शिक्षण देत आहे. उच्च शिक्षण देत असताना तसेच इतर प्रकल्पांच्या माध्यमातून काम करत असताना महाविद्यालयाला असे जाणवले कि समाज्याच्या विविध भागांमध्ये स्वयंसेवक आणि मार्गदर्शक यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे जेणेकरून ते अधिक प्रभावीरीत्या समाजकार्य करू शकतात. या सामाजिक गरजेची प्रतिक्रिया म्हणून महाविद्यालयाने समाजकार्यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केले.


निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयाच्या विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी विविध वयोगटातील लोक अत्यंत उत्साहाने सहभागी होत असतात व आपल्या अनुभवाचा उपयोग एकमेकांना करून देत असतात. सामाजिक कार्य करताना आवश्यक असणाऱ्या समाज, सामाजिक समस्या, सामाजिक न्याय, वंचीत घटकांचे प्रश्न या विषयांची माहिती या अभ्यासक्रमाअंतर्गत पुरवली जाते. एवढेच नव्हे, तर याचे निवारण करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये व दृष्टीकोन आत्मसात करण्यासाठी मदत केली जाते. प्राध्यापक शिकवणार व विध्यार्थी फक्त शिकणार अशा प्रकारची शिक्षणपद्धत्ती न अवलंबता विध्यार्थ्याच्या सक्रीय सहभागावर भर दिला जातो. विविध सामाजिक संस्थाना भेटी, प्रात्याक्षिके, परस्पर संभाषण, गट चर्चा, शैशणिक खेळ, जनजागृती गीते, पथनाट्य सादरीकरण, ठेवत सहभागातून शिक्षण यामुळे विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढतो तसेच यातून विविध कौशल्य आत्मसात करण्यास मदत होते. आत्तापर्यंत निर्मला निकेतन महाविद्यालयामधून समाज कार्यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम करून गेलेले विद्यार्थी मुंबई व मुंबई बाहेरील सामाजिक संस्था मध्ये काम करून समाजासाठी योगदान देत आहेत. बरेचसे विद्यार्थी प्रमाणपत्र अभ्यासक्रमावार मर्यादित न राहता सामाजिक क्षेत्रातील इतर अभ्यासक्रम करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा उंचावत आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी असे बरेच समाजसेवक उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया महाविद्यालयाने पुढे सुरु ठेवली आहे.

  • निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयाच्या गोरेगाव इथील विस्तार केंद्रामधून जानेवारी\ जुलै २०२४ पासून online/ offline mode मध्ये पुढील प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहेत:
  • PG Diploma in CSR (July, 1 year)
  • PG Diploma in Therapeutic Counselling (July, 1 year)
  • PG Diploma in Child Rights and Child Protection (July, 1 year)
  • Certificate in Para Counselling (July, 6 months)
  • Certificate in Social Work for Para Professionals (January, 6 months)
  • Skill Based Course in Social Work for Senior Citizens (January, 3 months)
  • 4 Credit Course in Geriatric Care (January, 3 months)

प्रवेश प्रक्रिया आणि अर्जाच्या माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा:

कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन, विस्तार केंद्र,
सेंट पायस कॉलेज कॅम्पस, गेट न. २, वीरवानि रोड,
गोरेगाव पूर्व, मुंबई-४०० ०६३
Phone: ०२२-२९२७०९८१/ ९९३०९९१९५३/ ९७६८००१३९७
Email: nnecentre@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *