डोंबिवली – रायगड – ठाणे- नवी मुंबई वारकरी संप्रदाय यांच्या वतीने दि ४ फेब्रुवारी २०२४ ते १२ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान सेंट्रल पार्क मैदान, खारघर येथे “राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशन आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाअधिवेशनाची जययत तयारी सुरू असून डोंबिवलीच्या ग्रामीण भागात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या सोहळयात चारही पीठाचे पिठाधिश्वर जगदगुरू शंकराचार्य, सकल संतांचे वशंज अशा महान विभूतींचे दर्शन होणार आहे. त्यामुळे या ऐतिहासीक सोहळयाचे साक्षीदार बनण्याचे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या भव्य दिव्य सोहळयाची तयारी सुरू आहे. रायगड ठाणे आणि नवी मुंबईतील प्रत्येक गावात प्रचार संभा घेऊन तसेच हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात या सोहळयाचे निमंत्रण देण्यात आले आहे. आता शेवटच्या टप्प्यात गेल्या दोन दिवसांपासून प्रचार रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक गाव पिंजून काढला जात आहे.
कोळे गाव पासुन रॅलीला प्रारंभ झाला. हेदुटणे – अंतर्ली – शिरढोण – वाकलन- वडवली – नारीवली – बाले – घेसर – निळजे – काटई – कोळे घारिवली – भोपर – नांदिवली – संदप – उसारघर -अगासान- बेतावडे – म्हातर्डी – दातिवली – दिवा – खर्डी – फडकेपाडा – शीळ कोळे गाँव – देसाई – खिडकाळी – पडले – डायघर – उत्तरर्शिव – भंडार्ली- दहिसर – नागाव पाली – चिरड – पागद्याचा पाडा – नाऱ्हेन – उसाटने – बर्दुल – करवले – पोसरी शेलारपाडा – चींचीवली – नेवाली कोळे – पाले – गोरपे – बोनीवली – वाडी – कुशिवली – आंबे – खरड – ढोके – काकडवाल- मांगरूळ – वसार – मानेरे – अशेळे – चिंचपाडा – नांदिवली – द्वारली – भाल तिसगाव – पिसिवली – नेतीवली – गोळवली – दावडी – सोनारपाडा – मानपाडा – उंबार्ली आदी गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. तसेच गावागावात वाहनांवर महाअधिवेशनात पोस्टर चिकटवून प्रचार करण्यात आला.
या रॅलीमध्ये रामकृष्ण महाराज मुंढे (नारिवली), संतोष अर्जुन केणे (ठाणे जिल्हा अध्यक्ष), अजय पाटील (मांगरुक) हनुमान सत्यवान पाटील (कोळे), प्रसाद गोपीनाथ पाटील (कोले), प्रेमनाथ यशवंत पाटील (कोळे), जेजेराम कृष्णा वायले (वसार), अरुण दशरथ वायले (वसार), राहुल संतोष केणे (आयरे), प्रणव संतोष केणे (आयरे), शशी गंगाधर पाटील (डायघर), मधुकर माळी, शिवाजी पाटील (भोपर), दयानंद म्हात्रे (डोंबिवली), हेमंत अंबेकर (डायघर) , जयेश सावंत पाटील( कोळेगाव) , बाळकृष्ण महाराज पाटील (उसाटणे), सुदाम हिलाल (उसाटणे), आनंता पाटील (आंतर्ली), संकेत गाईकवड, जाहिद शैख, आकाश तायडे, सुमित हिलाल, आकाश जयसवाल, शनी राजपुत, राज दादा रोहून कोपच्या, साहिबा पवार आदी सहभागी झाले होते.
नऊ दिवस चालणा-या या सोहळयात दररोज एक लाख लोकांची उपस्थिती लाभणार आहे. या महाअधिवेशनात संतवीर श्रीगुरू हरी भक्त परायण बंडातात्या महाराज कराडकर यांच्या उपस्थितीत आणि श्रीमद भागवत कथा प्रवक्ते श्री गुरू हरी भक्त परायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमदभागवत कथा, महापुराण कथामृतांचे रसपान होणार आहे. तसेच या भव्य दिव्य सोहळयात ज्येष्ठ किर्तनकार वारकरी व फडकरी यांच्याबरोबरच ५ हजार टाळकरी ५ हजार ज्ञानेश्वरी वाचक ३ हजार मृदंगवादक उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे सर्वांनी या सोहळयाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रचार रॅलीच्या माध्यमातून गावागावात करण्यात आले.