सिडको प्रकल्पबाधितांना 22.5 टक्के विकसित भूखंड वाटपाचा निर्णय

मुंबई : सिडको महामंडळातर्फे जमीन संपादन करून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प बाधितांना 2013 च्या जमीन संपादन कायद्यातील तरतुदींपेक्षा जास्त मोबदला देऊन त्यांचे पूनर्वसन करण्यासाठी प्रकल्पबाधितांना  22.5 टक्के विकसित भूखंड वाटप करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासह नवी मुंबई प्रकल्पास चालना देण्यासाठी 1 मार्च 2014 व 28 मे 2014 च्या शासन निर्णयानुसार प्रकल्पबाधितांना 22.5 टक्के विकसित भूखंड वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच निर्णयाप्रमाणे सिडकोतर्फे राबविण्यात येणाऱ्या नेरूळ येथील नैना प्रकल्प, बेलापूर-सीवूड-उरण रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प व मुंबई पारबंदर प्रकल्प (एम.टी.एच.एल.) तसेच सिडकोकडून भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 च्या कलम 126(1) अ आणि (ब) अन्वये खाजगी मालकीची जमीन वाटाघाटीद्वारे संपादन कार्यप्रणालीअंतर्गत प्रकल्पग्रस्तांना 22.5 टक्के विकसित भूखंड देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच 22.5 टक्के योजनेंतर्गत देय असेलेला भूखंड 40 चौरस मीटरपेक्षी कमी असल्यास महसूल व वन विभागाच्या मार्च 2015 मधील अधिसूचनेनुसार जमिनीचा मोबदला ठरवून रोख रक्कम भरपाई म्हणून देण्यास मान्यता देण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!