प्रत्येक बलात्कारातील दोषींना फाशीच द्या : जनतेची भावना !
दिल्ली : लहान मुलींवर बलात्काराच्या घटनेत वाढ होत असल्याने केंद्र सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. 12 वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी देण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले असले तरी वयाचे बंधन न पाळता बलात्कारातील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी भावनाही जनतेतून व्यक्त होत आहे.
कठूआ आणि उन्नाव येथील अल्पवयीन मुलींवरील बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाचे वातावरण पसरलय. त्यामुळे दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सर्वच स्थरातून व्यक्त करण्यात आली होती. सध्या पॉस्को कायद्यात दोषींला कमीत कमी 7 वर्ष ते आजीवन कारावासाची शिक्षा आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळाने पॉस्को कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा मिळणार आहे . त्यामुळे हा ऐतिहासिक व मोठा निर्णय ठरला असून लवकरच अध्यादेश जारी होणार आहे.