मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या (२९ फेब्रुवारी) चौथ्या दिवशीही विरोधकांकडून सभागृहाच्या पायऱ्यावर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राज्यातील पेपर फुटी प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, राज्यात दररोज वेगवेगळ्या परीक्षा होत आहेत. पण रोज पेपरफुटीचे प्रकरण घडत आहेत. दररोज राज्यातील विविध भागातून पेपर फुटल्याचे फोन येत आहेत. परंतु, ज्यांच्याकडे पैसे आहेत, अशा लोकांचे रॅकेट महाराष्ट्रात कार्यरत असून, ते रॅकेट पेपर फोडत आहेत. आठ दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात असे घडल्यानंतर त्यानंतर त्यांनी सर्व परीक्षा रद्द केल्या. त्यामुळे या प्रकरणी सरकारने ठोस पाऊले उचलली पाहिजे. त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये सरकारकडूनच प्रोत्साहन देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकारने प्रयत्न करावे. अशी मागणी दानवे यांनी केली.