कल्याण ( प्रतिनिधी) : चीनच्या विश्वासघातकी भूमिकेचा देशाच्या सर्वोच्च पातळीपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांकडूनच निषेध व्यक्त होत आहे. या तरुणाने चीनच्या झेंड्याचा आणि कोरोनाचा केक कापून निषेधात्मक स्वरूपात आपला वाढदिवस साजरा केला. तसेच इतरांनीही अशाच प्रकारे चीनचा निषेध करून त्यांच्या उत्पादनांवर बंदी घालून त्यांना धडा शिकवण्याचे आवाहन केले.
सध्या संपूर्ण जगासह आपल्याकडे धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचे उगमस्थान काय आहे हे सर्वांना परिचित आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी चीनने भारताशी आगळीक करत भारतीय सैन्यावर हल्ला केला. चीनच्या या कृत्याचा निषेध म्हणून आपण चीनच्या राष्ट्रध्वजाचा केक कापून त्यांचा निषेध केला आणि चीनच्या उत्पादनांवर संपूर्ण भारतीयांनी बहिष्कार घालण्याची मागणी केल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाच्या गौरव गुजर यांनी दिली. यावेळी गौरव गुजर आणि काही निवडक मित्रांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हा आंदोलनात्मक उपक्रम साजरा केला. तसेच यावेळी चीनविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!