मलिष्का, आता तरी बीएमसीवर भरोसा ठेव ना !
मुंबईतील खड्डयांच्या तक्रारी घटल्या
मुंबई : तीन महिन्यापूर्वी मुंबईच्या खड्ड्यावर रेड एफएमची सुप्रसिद्ध आरजे मलिष्काने एक मराठी गाणे तयार करून खळबळ उडवून दिली हेाती.  मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्यावर्षी मुंबईतील खड्डयांच्या तक्रारींचे प्रमाण घटले असल्याची माहिती महापालिकेने आकडेवारीसह  दिलीय.  १ एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ या सहा महिन्याच्या कालावधीत  १ हजार ४६३ खड्डयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी बीएमसीने ९० टक्के खड्डयांची कामे पूर्ण केली असल्याची माहितीही महापालिकेने दिलीय. त्यामुळे मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाय का ? म्हणणा-या  मलिष्काला आता तरी बीएमसीवर भरोसा ठेव ना !   असंच म्हणावे लागणार आहे.
मुंबई महापालिकेचे आयुक्त अजेाय मेहता यांच्या दालनात पालिका अधिका-यांची मासिक आढावा बैठक पा‌र पडली. त्यावेळी खड्डयांबाबतच्या तक्रारी घटल्याची माहिती पालिका अधिका-यांकडून आयुक्तांना देण्यात आली. गेल्या वर्षी २०१६-१७ मध्ये ५ हजार ३१६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यंदाच्या वर्षी १ हजार ४६३ तक्रारींपैकी १ हजार ३२७ तक्रारींची कामे पूर्ण करण्यात आले आल्याचे सांगण्यात आले. २०१४ – १५ मध्ये महापालिकेकडे १४ हजार ४५५ खड्डे विषयक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. २०१५ – १६ मध्ये ५ हजार ३१६; तर २०१६ – १७ मध्ये ४ हजार ४७८ खड्डयांच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. यंदाच्या वर्षी १ हजार ४६३ खड्डयांच्या तक्रारीपैकी १ हजार ३२७ तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे. २०१५–१६ मध्ये २५ हजार १३० मेट्रीक टन, २०१६–१७ मध्ये २९हजार६३७ मेट्रीक टन तर यावर्षी १३हजार३४ मेट्रीक टन डांबर वापरण्यात आले असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केलयं.
१६९ धार्मिक स्थळांवर कारवाई 
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवर १७ नाव्हेंबर २०१७ पूर्वी कारवाई करावी करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रात ४९५ धार्मिक स्थळे आहेत. यापैकी ३२६ धार्मिक स्थळांवर यापूर्वीच कारवाई करण्यात आली असून १६९ धार्मिक स्थळांवर कारवाई शिल्लक आहे. या कारवाईसाठी नियोजन बध्द कार्यक्रम आखावा असे आदेशही आयुक्तांनी संबधित विभागाला दिले आहेत.
मुंबईत २४ विभागात सायकल ट्रॅक
दक्षिण मुंबईतील एनसीपीए पासून ते वरळी सी लिंक पर्यंत दर रविवारी सकाळी ६ ते ११ दरम्यान सायकल ट्रॅक करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे त्याच धर्तीवर महापालिकेच्या २४ विभागामध्ये सायकल ट्रॅक तयार करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सुचनाही आयुक्तांनी केल्या.

2 thoughts on “मलिष्का, आता तरी बीएमसीवर भरोसा ठेव ना !”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *