सव्वाशे वर्ष जुन्या धोबी घाटने घेतला मोकळा श्वास : पालिकेने अतिक्रमणे हटवली
मुंबई : सव्वाशे वर्ष जुन्या धोबी घाटने शुक्रवारी मोकळा श्वास घेतला. पालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागाने मुंबई पोलीसांच्या सहकार्याने धडक कारवाई करीत धोबी घाट येेेथीलपायवाटा मोकळ्या केल्या आहेत. तसेच ५ ठिकाणी उभारण्यात आलेले अनधिकृत शेड देखील तोडण्यात आले आहे,
महालक्ष्मी स्टेशनजवळ असणारा धोबी घाट म्हणजे मुंबईत येणा–या पर्यटकांचे एक महत्त्वाचे आकर्षण. गेली सुमारे सव्वाशे वर्ष हा धोबी घाट स्वच्छतेत आपले योगदान देत आहे. याच धोबी घाट परिसरात कपडे धुण्यासाठी जशा अनेक जागा आहेत, तशाच अनेक छोट्या पायवाटा देखील आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये या पायवाटांवर अतिक्रमणे; तर काही हौदांवर अनधिकृत बांधकामे झाली होती. याचबरोबर काही ठिकाणी अनधिकृत ‘शेड‘ देखील उभारण्यात आले होते. त्यामुळे या धोबी घाट परिसरात कपड्यांचे गाठोडे घेऊन येणा–या – जाणा–यांना चालण्यास अडथळे येत होते.