मनसेच्या फुटीर नगरसेवकांची पालिकेच्या सभेला दांडी
महापौरांनी उडवली मनसेची खिल्ली
मुंबई : मनसेतुन फुटून शिवसेनेच्या तंबूत दाखल झालेल्या सहा नगरसेवकांसाठी मनसेने व्हीप जारी केला होता त्यामुळे हे नगरसेवक आजच्या सभेत कुठे बसणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र या नगरसेवकांनी सभेला दांडी मारल्याने सगळ्यांच्या उत्सुकतेवर पाणी फेरले. दरम्यान व्हीप बाजावण्याचा अधिकार हा गटनेत्याला पडतो त्यामुळे हा व्हीप कायद्याला धरून नसल्याची खिल्ली महापौर विशवनाथ म्हाडेश्वर यांनी उडवली.
बुधवारी मनसेचे चार नगरसेवक घरवापसी करण्यासाठी राज ठाकरे यांना भेटणार अशी अफवा पसरली. मात्र या सहाही नगरसेवकांनी ही अफवा असल्याचे सांगून आम्ही शिवसेनेसोबतच असल्याचे पत्रक काढून खुलासा केला होता. गुरुवारी पालिकेची सर्वसाधारण सभा असल्याने मनसेने या नगरसेवकांना व्हीप काढल्याने पुन्हा राजकारण वातावरण तापले. त्यामुळे पालिका सभागृहात हे सहाही नगरसेवक कुठे बसणार अश्या चर्चेला वेग आला होता. मात्र नगरसेवकांनी सभेला दांडी मारल्याने मनसेने काढलेल्या व्हीप चे हसे झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात पसरली होती.
गटनेत्याशिवाय व्हीप बेकायदेशीर
मनसेचे गटनेते सेनेत दाखल झाले आहेत. गटनेत्याशिवाय पक्षाला व्हीप काढता येत नाही, त्यामुळे मनसेचा व्हीप बेकायदेशीर असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ते आज सभागृहात का अनुपस्थित राहिले याची कल्पना नाही. मात्र ते सभागृहाचे सदस्य आहेत, ते येऊ शकतात. त्यांच्यावर राजकीय दबाव टाकला जातोय. आहे. ते सेनेत आल्याने अनेकांनी पोटदुखी झाल्याचा टोलाही महापौरांनी लगावला.
——-
Or ρossibⅼy he likes bowling.? Lee contіnued.
?I heard someƄody saay that whenever you hear thundеr, that implies
tyat God is bowsling in heaven. I wager hes actually good at it.
Υou mean like after we ing rewaգrd songs in Church?? Larry requested and
ԁadⅾy nodded. ?Effectively I could make up a worship song.?
So Larгy jumped to his feet and commenced to make up a
song too a very unhealthy tune. ?Jesus is so cool. Its fun being with
God. Hes the funnest Good anybody mɑy have.? Larry sang very badly
so Lee hɑd put һis hands over his ears.