मुंबईत ३१४ ठिकाणी  पालिकेचा हातोडा :  ७ उपहारगृहांना ठोकले सील 

मुंबई : कमला मिल्स आगीनंतर हॉटेल व पबच्या अनधिकृत बांधकामावर शनिवारी मुंबई महापालिकेने धडक मोहिम राबवली.  जवळपास ६२४ ठिकाणी महापालिकेने तपासणी केल्यानंतर ३१४ ठिकाणी अनियमितता झाल्याचे व अनधिकृत बांधकाम आढळून आले त्या सर्व अनधिकृत  बांधकामांवर  पालिकेने कारवाई करीत ती जमिनदोस्त केली.  तर ७ उपहारगृहे सील करण्यात आली. त्याचबरोबर ४१७ पेक्षा अधिक सिलिंडर देखील  जप्त करण्यात आलेत.  या कारवाईसाठी सर्व २४ विभागांमध्ये प्रत्येकी ३ पथक तयार करण्यात आली होती. महापालिकेचे सुमारे १ हजार कामगार-कर्मचारी-अधिकारी या कामी आज कार्यरत होते. कारवाईच्यावेळी  अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरेश्रीमती आयकुंदनअतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरेविजय सिंघलअतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब जहाड हे स्वत: हजर होते.

हॉटेल, मॉलला इशारा
उपाहरगृहे, हॉटेल्स, मॉल्स यांनी आपल्या स्तरावर अग्निसुरक्षेसह सर्व बाबींची तपासणी करावी व नियमांनुसार आवश्यक त्या सुधारणा तातडीने करवून घ्यावात. अन्यथा, ज्या ठिकाणी नियमबाह्य व बेकायदेशीर बाबी आढळून येतील, त्या तात्काळ तोडण्यात येतील असा इशाराही पालिकेने दिलाय.

कुठे केली कारवाई

 ए  वॉर्ड – काळा घोडा जवळील खैबर हॉटेल,
– दादाभाई नौरोजी मार्गावरील जाफरान हॉटेल,
– मर्जबान मार्गावरील बरिस्ता हॉटेल

बी वॉर्ड  दोन उपहारगृहांवर कारवाई

सी  वॉर्ड  – कॅथॉलिक जिमखाना, – पारशी जिमखाना
– विल्सन जिमखाना – इस्लाम जिमखाना

डी वॉर्ड – हॉटेल शालीमार, मौ. शौकत अली मार्ग (हुक्का पार्लर)
– नित्यानंद हॉटेल, राजाराम मोहन रॉय मार्ग
– से चीज हॉटेल, जैन टॉवर, मॅथ्थु रोड (हुक्का पार्लर)
– हॉटेल रिव्हायवल, गिरगाव चौपाटी

इ  वॉर्ड – साहिल हॉटेल
– मराठा मंदिर कॉलेजच्या गच्चीवरील अनधिकृत कँटीन व शेड तोडले

 एफ /दक्षिण वॉर्ड  – डॉमिनो पिझ्झा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग,
– फासोस उपहारगृह, – ऍक्फा उपहारगृह
– कैलास लस्सी, दादर

एफ /उत्तर वॉर्ड  – अयप्पा इडली सेंटर
– आर्यभवन, – माया स्वीट, – गुरुनानक स्वीट
– केरळा हॉटेल

जी /दक्षिण वॉर्ड  – कमला मिल मधील लेडी बागा, हक से, द फॅटीबो, डीआएच, ग्रँड मा कॅफे, मिल्क, झायको, टप्पा, पीओएच, कोड, प्रवास, स्मॅश
– रघुवंशी मिल मधील अनेक अनधिकृत बांधकामे
– ऍट्रीया मॉल मधील उपहारगृह इत्यादी

जी / उत्तर वॉर्ड – विविध उपहारगृहे, हॉटेल इत्यादींमधील अनधिकृत बाबी

 एच /पूर्व वॉर्ड – एमआयजी इत्यादी

एच /पश्चिम वॉर्ड – जंक यार्ड, – हिल रेड
– न्यूयॉर्क चॅपल रोड, – केएफसी मॉल
– झेन शॉपिंग सेंटर, – यू टर्न
– बॉम्बे अड्डा – रेडियो बार
– ओन्ली पराठा इत्यादी

के /पूर्व वॉर्ड – पेनीनसुला हॉटेल, – हॉटेल ऑर्किड इंटरनॅशनल
– हॉटेल बावा

 के /पश्चिम वॉर्ड  – शिशाज स्काय लाऊंजच्या गच्चीवरील ९ हजार चौरस फूटांचे अधिकृत बांधकाम तोडण्यात येऊन गच्ची सिल करण्यात आली
– कुब, – क्रिस्टल पॉइंट मॉल
– प्राव्होग, – टॅप रेस्टॉरंट

पी /दक्षिण वॉर्ड  – हॉटेल आझोन, – पिकासो
– एव्हर शाईन मॉल इत्यादी

पी /उत्तर वॉर्ड   – रिट्रीट हॉटेलचे बेसमेंट तोडले

एल वॉर्ड – पेनीनसुला हॉटेल,
– हॉटेल चॉईस ली (वीज व पाणीपुरवठा तोडला)
– हॉटेल मेग्रुस्सा

एम /पूर्व वॉर्ड  – गिरीजा हॉटल, – मिडनाईट बार
– सदगुरु हॉटेल, – आदित्य हॉटेल
– चेंबूर 74 हॉटेल

एम /पश्चिम वॉर्ड  – प्लॅमिंगो आणि सोई ही २ उपहारगृहे सिल केली

एन  वॉर्ड  – आरसिटी मॉल, – आर. के. हॉटेल
– जॉली जिमखाना, – नीलकंठ बँक्वेट
– संतोष बार ऍण्ड रेस्टॉरंट इत्यादी

एस  वॉर्ड  – जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड वरील सागर
– 38 फीस्ट, – मिनी पंजाब
– सॅम्स किचन
वरील चारही उपहारगृह सील करण्यात आले

टी वॉर्ड – शिल्पा, – विश्व सम्राट इत्यादी

आर /दक्षिण वॉर्ड  – पेंट हाऊस, व्ही मॉल – जैमिज ढाबा
– सरोवर, – रामाज, -निर्वाणा
इत्यादी

आर /मध्य वॉर्ड  – रघुलिला मॉल, – तनिष्का हॉटेल
– मोक्ष प्लाझा – ठक्कर मॉल हुक्का पार्लर

आर /उत्तर  वॉर्ड 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!