५५ अनधिकृत बांधकामावर पालिकेचा बुलडोझर 

वैशालीनगर परिसराने घेतला मोकळा श्वास

मुंबई : जोगेश्वरी पश्चिमेतील वैशाली नगर कपडा मार्केट परिसरातील रस्ते व पदपथांवर असलेल्या अनधिकृत  बांधकामावर गुरुवारी पालिकेने बुलडोझर फिरवून जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे वैशालीनगर परिसरातील पदपथाने  मोकळा श्वास घेतलाय.
वैशालीनगरमध्ये प्रामुख्याने कापड विक्रीशी संबंधित होती. पदपथ आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने लोकांना चालण्यासाठी मार्ग नव्हता. तसेच यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. अखेर पालिकेच्या के पश्चिम विभागाने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. तसेच प्लास्टिकचे ८ शेड्सही तोडण्यात आले अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!