मुंबई महापालिका आयुक्तांनी केली स्वतः च्या विशेषाधिकारात कपात ; निम्न पदांच्या स्तरावर केेले बहाल,  ३५ पैकी २३ अधिकार झाले कमी ! 
मुंबई ;  मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आयुक्तांना असलेल्या विशेषाधिकारात कपात केलीय. विकास नियोजन आराखडा व विकास नियंत्रण नियमावलीनुसार विविध ३५ बांधकाम परवानग्या देण्याचे विशेषाधिकार महापालिका आयुक्तांना होतेया आपल्या विशेषाधिकारात कपात करुन ते ३५ वरुनकेवळ १२ करण्याचे महापालिका आयुक्तांनी प्रारुप विकास आराखडा – २०३४‘ मध्ये प्रस्तावित केले होतेआता प्रारुप विकास नियोजन आराखडा २०३४‘ व संबंधित विकास नियंत्रण नियमावलीस राज्य शासनाची मंजूरी प्राप्त झाली आहेज्यामुळे महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित केल्यानुसार २३ परवानग्यांबाबत त्यांच्या विशेषाधिकारामंध्ये कपात होऊन ते निम्न पदांच्या स्तरावर बहाल करण्यात आले आहेतअधिकारांच्या या विकेंद्रीकरणामुळे विशेषाधिकारांची संख्या आता ३५ वरुन १२ झाली आह
 
हे  23 अधिकार केले कपात 

स्टॅक पार्किग पझल पार्किंग यांत्रिकी पार्किग यांना सामावून घेण्यासाठी स्टील्टची उंची ४.२ मीटर देण्याबाबत सूट

विकास नियंत्रण नियमावलीत विहीत केल्यानुसार खोल्यांचा आकार पुरेसा नसण्याबाबत (उदाहरणार्थछोट्या आकाराच्या खोल्या ज्यामध्ये देवघरअडगळीची खोली इत्यादींबाबतची परवानगी)

इमारतीच्या स्टील्टमध्ये पोडियम मध्ये विद्युत उपकेंद्राबाबत(Electric Sub-station) परवानगी

नियोजनातील निर्बंधामुळे पोकळी (Void) निर्माण होत असल्यास ती चटई क्षेत्र निर्देशांक मुक्त करणे

प्रस्तावित पार्किग जागा या आवश्यक असणाया पार्किग जागांपेक्षा कमी असल्यास त्याबाबत सूट देणे

नियमित आकाराची खोली देण्याऐवजी बहुउद्देशीय खोली देण्याबाबतची परवानगी

कृत्रीम वायूविजन शाफ्टचा आकार पुरेसा नसल्यास त्याबाबत सूट देऊन परवानगी देणे

आवश्यक असणाया पार्किग जागांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त लहान पार्किग जागा देण्याबाबतची परवानगी

अधिमूल्य आकारुन दुकाने उपहारगृहे डुप्लेक्स सदनिका याकरिता आतील जिन्याबाबत चटई क्षेत्र निर्देशांकात परिगणन न करता परवानगी देणे

१०आवश्यकतेपेक्षा जास्त सदनिका घनता (Tenement Density) देण्याबाबतची परवानगी

११संबंधित पट्टयात (Zone) अनुज्ञेय असलेल्या उपक्रमात बदल करण्याबाबत परवानगी

१२मार्गिकेच्या पुरेशा नसलेल्या रुंदीबाबत सूट देण्याची परवानगी

१३मजल्यांची कमी उंची करण्याबाबतची परवानगी

१४पार्किगसाठी प्रस्तावित असलेल्या तळघरात प्रवासी उद्वाहन जाऊ शकेल याबाबतची परवानगी

१५गृहनिर्माण संस्थेचे कार्यालय वरील मजल्यावर देण्याची परवानगी

१६विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आवश्यक असणाया पार्किग जागांपेक्षा २५ टक्के अतिरिक्त पार्किग जागा

देण्याची परवानगी

१७पीछेहाटीचे क्षेत्र (Setback Area)/ विकास नियोजन रस्ता यांच्या चटई क्षेत्र निर्देशांकांचा फायदा अगोदरच घेतलेला आहे तो चटई क्षेत्र निर्देशांक संरक्षित करणे याबाबतची परवानगी

१८१५०० चौ.मीपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या भूखंडावर पोडियमची परवानगी देणे

१९इमारतीमध्ये शॉपींग डिपार्टमेंटल स्टोअर नर्सिग होम बाबत परवानगी देणे

२०मोठ्या आकाराच्या कॅनॉपीला परवानगी देण्याबाबत

२१भूखंडास लगतच्या किमान ६ मीटर रुंदीच्या दोन रस्त्यांनी प्रवेश मार्ग असल्यास इमारतीचा विकास ७० मी.

पर्यत उंच करण्याकरिता परवानगी देणे

२२भूखंडास लगतच्या किमान ६ मीटर रुंदीच्या रस्त्याने प्रवेश मार्ग असल्यास इमारतीचा विकास ३० मीपर्यत उंच करण्याकरिता परवानगी देणे

२३भूखंडावर आवश्यक असलेल्या मोकळ्या जागेत २४ मीटर उंचीच्या यांत्रिकी पार्किग टॉवरसाठी ३.६ मीइतकीतर २४ मीपेक्षा जास्त उंची असल्यास ६ मीइतकी इमारतीच्या भोवतालची मोकळी जागा गृहीत धरुन लागणाया इमारतीच्या भोवतालच्या मोकळ्या जागेमधील कमतरता अधिमूल्य भरुन परवानगी देण्याबाबत

हे १२ अधिकार कायम

इमारतींच्या लगतच्या मोकळ्या जागेतील कमतरतांबाबत सूट देणे

अनुमत फंजीबल चटई क्षेत्र निर्देशांकास परवानगी देणे

जीनाजीन्याची लॉबीउद्वाहनउद्वाहनाची लॉबी यांच्या क्षेत्राबाबत चटई क्षेत्र निर्देशांक परिगणन न करण्याकरिता परवानगी

विकास नियंत्रण नियमावलीतील नियम क्रमांक ३३ (अन्वयेतांत्रिक व वैद्यकीय संस्था आणि संस्था इमारती / शासकीय इमारती आणि निमशासकीय कार्यालयाच्या इमारती सार्वजनिक उपक्रमाच्या इमारती आणि तांत्रिक संस्था विभागीय इमारती यांना देण्यात येणाया अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकांबाबत परवानगी

भूखंडावर आवश्यक करण्यात आलेल्या मनोरंजन मैदानाचा आकार वेडावाकडा असल्यास तो वाहनांच्या आवागमनासाठी फरसबंद करण्याची परवानगी

वाहनांच्या दुहेरी आवागमनाकरिता असलेल्या जागेतील काही भाग पुरेसा रुंद नसल्यास त्याबाबत सूट देण्याची परवानगी

विलगीकरण अंतराबाबत (Segregate Distance) सवलत देण्याची परवानगी (औद्योगिक क्षेत्रापासून निवासी इमारतींचे विलगीकरण अंतर)

मुंबई वारसा जतन समितीचे नाहरकत प्रमाणपत्र २४ मीटर किंवा त्याहून अधिक उंचीच्या इमारती वारसा विभागात (Heritage precinct) असल्यास बंधनकारक करु नये याविषयी परवानगी

. जीन्याची रुंदी पुरेशी नसल्याबाबत सूट देण्याची परवानगी

१०दोन मोटर उद्वाहन (Car lift) ऐवजी एकच मोटर उद्वाहनासाठीची परवानगी

११इमारतीच्या दर्शनी मोकळ्या जागेमध्ये प्रस्तावित लोखंडी पाययांबाबत (MS steps) परवानगी

१२आवश्यक असलेल्या दुसया जीन्याबाबत सूट देण्याबाबतची परवानगी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!