बालक मेळाव्यात विद्यार्थांची साहसी क्रीडा प्रात्यक्षिके

महापौर, आदित्य ठाकरेसह उपस्थितांची  दाद

मुंबई :  महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे परेल येथील झेव्हीअर्स मैदानावर “शारीरिक शिक्षण बालक मेळावा-२०१८”, चे आयोजन करण्यात आलं होत. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थांनी साहसी क्रीडा प्रात्यक्षिके सादर केली.विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्रीडा कलागुणांचा अविष्कार पाहून मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, उपमहापौर श्रीमती हेमांगी वरळीकर यांच्यासह उपस्थितांची दाद मिळाली. शारीरिक शिक्षण क्रीडा प्रात्यक्षिक मध्ये मलखांब व रोप मलखांब, मानवी मनोरे, मोठी रिंग, फ्रॉलिक्स, लेझिम, तालीम, योगासने तसेच मनोरजनांचे विविध कलागुंण विद्यार्थ्यांने यावेळी सादर केले. यावेळी बोलताना महापौर महाडेश्वर म्हणाले की, महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा लौकिक आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. महापालिकेचे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रासह अन्य बाबतीतही आपला वेगळा ठसा उमटवित आहेत. यासाठी महापालिकेचा शिक्षण विभाग अविरत कार्य करत असतो. शिक्षण विभाग अधिकाधिक प्रगतीपथावर रहावा यासाठी महापालिका दक्ष असल्याचेही महापौर महाडेश्वर यांनी सांगितलं. या बालक मेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त (शिक्षण)  मिलीन सावंत यांनी तर आभार शिक्षणाधिकारी  महेश पारकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *