महापालिकेच्या पूर्वपरवानगीने पावसाळ्यापूर्वी झाडांची चटणी करा: बीएमसीचे आवाहन

मुंबई  ( संतोष गायकवाड ): वृक्ष गणनेनुसार महापालिका क्षेत्रात एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खाजगी आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत, अशी माहिती उद्यान खात्याद्वारे देण्यात आलीय. 

महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी असणाया झाडांची वृक्षांची निगा महापालिकेद्वारे नियमितपणे घेण्यात येत असतेतथापिसोसायटीशासकीय निमशासकीय संस्थाखाजगी जागा इत्यादींमध्ये असणाया झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असतेपावसाळ्याच्या काळात झाडे पडून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असतेहे लक्षात घेऊन  सर्व संबंधितांनी महापालिकेच्या पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील अवास्तव वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यातअसे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे

तसेच मृत झालेल्या किंवा किडीचा प्रादुर्भाव असलेल्या झाडांबाबत देखील महापालिकेच्या विभाग कार्यालयातील वृक्ष अधिकायांशी  संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कार्यवाही पावसाळ्यापूर्वी करवून घ्यावीअसेही आवाहन उद्यान अधीक्षक  जितेंद्र परदेशी यांनी केलय.

अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात उद्यान खात्याची एक विशेष बैठक झालीया बैठकीत सिंघल यांनी उद्यान विभागाला पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत

महाराष्ट्र (नागरी क्षेत्रझाडांचे संरक्षण व जतन अधिनियम,१९७५‘ नुसार महापालिका क्षेत्रातील झाडांची छाटणी किंवा मृत /धोकादायक झाड कापावयाचे झाल्यास त्याबाबत महापालिकेद्वारे पूर्व परवानगी प्राप्त करुन सुयोग्य छाटणी करणे बंधनकारक आहेतसेच छाटणी झाल्यानंतर झाडाच्या तोडलेल्या फांद्या व इतर कचयाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही संबंधितांचीच आहेतथापिमहापालिका नियुक्त ठेकेदाराद्वारे छाटणी केल्यास कचयाची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याची कार्यवाही ठेकेदाराद्वारेच करायची आहे. 

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *