गांवदेवी उत्सवानिमित्त रक्तदान शिबीर

डोंबिवली :- जय गांवदेव मित्र मंडळ कोळेगाव, वारकरी संप्रदाय मंडळ ब ग्रामस्थ मंडळ कोळेगाव यांच्या वतीने गांवदेवाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आलेले होते.ज्यामध्ये गावातील नवीन लग्न झालेल्या ५ पतीपत्नी यांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर ज्ञानाई महिला हरिपाठ मंडळ कोळेगाव यांच्यावतीने हरिपाठ सादर करण्यात आला. ह.भ.प.श्री.राजाराम महाराज(घारीवली) यांचे प्रवचन झाले. सायंकाळी ह.भ.प.कुमारी आरतीताई हरिश्चंद्र खाटेघरे(मुरबाड) यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले. या उत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आलेले होते. ज्यामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उत्सवानिमित्त समाजातील अनेक भाविक, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. सदर उत्सव यशस्वी करण्यासाठी जय गांवदेव मित्र मंडळाचे प्रेमनाथ पाटील, श्रीराम पाटील, जितेंद्र पाटील, रविकांत पाटील, योगेंद्र पाटील, दिनेश पाटील, प्रसाद पाटील व सदानंद संते यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *