आपला धर्म आणि देश केंद्र स्थानी ठेऊन काम करा : अॅड. दिपक गायकवाड
कर्जत ( राहुल देशमुख) : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने शौर्य दिनानिमित्त देशाच्या सिमेवर आपणा सर्वांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी ” आपल्या रक्ताचे काही थेंब महत्त्वाचे ” या शीर्षकाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन कर्जत येथील आंबा माता मंदिराच्या सभागृहात पार पडले. या शिबिरात १०१ लोकांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे संघटन मंत्री अॅड. दिपक गायकवाड, कुलाबा जिल्हा अध्यक्ष बोरसे सर, रा. स्व. संघाचे तालुकाप्रमुख चितळे सर, वि.हिं. परिषदेचे मोगरे सर, धर्म प्रचारप्रमुख प्रल्हाद शिंदे, तालुकाध्यक्ष विनायक उपाध्याय, सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना अॅड. दिपक गायकवाड म्हणाले की, देशाच्या सिमेवर आपणा सर्वांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी प्रथम आपला धर्म आणि देश केंद्र स्थानी ठेऊन काम करा. तरच, आपल्याला देशासाठी काय चांगल करायच आहे स्मरण होईल. कारण याच देशात काही गद्दारांनी सैनिकांच्या कर्तृत्वावरच संशय घेण्यास सुरुवात केली आहे. म्हणून शौर्य दिनानिमित्त आपण सर्वांनी सैनिकांचे आदराचे स्थान कायम राखले गेले पाहिजे असे काम आपल्याकडून झाले पाहिजे असे सांगितले. रक्तदान शिबीरासाठी हिंदू ह्रदय सम्राट बाबासाहेब ठाकरे ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. उमेश आसंवार आणि त्यांच्या दहा सहकार्यांचे पथक आणि पाच खाटा लावण्यात आल्या होत्या. यावेळी किसान मोर्चाचे म. प्र. सचिव सुनिल गोगटे,माजी जिल्हा चिठणिस रमेश मुंढे, तालुका अध्यक्ष दिपक बेहेरे , वसंत भोईर, नगरसेवक अशोक ओसवाल , सरचिटणीस राजेश भगत, सोशल मिडिया सेल संयोजक विलास श्रीखंडे आदीजन उपस्थित होते. तर, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बजरंग दलाचे कुलाबा संयोजक साईनाथ श्रीखंडे, महेश बेडेकर, विशाल जोशी, रमेश नाईक, मनोज बेडेकर, सुधीर साळोखे, करमरकर सर, कमलाकर किरडे, मोंटु बडेकर , अमोल ओसवाल, रोहित बाफना, अशोक ओसवाल आदी सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.