मुंबई : हिमानी बुंदेल ही दृष्टीहीन कौन बनेगा करोडपतीच्या १३ व्या पर्वात पहिल्या कोटयाधीश महिला ठरली आहे. “यूं तो जिंदगी सभी काट लेते हैं यहां, मगर जिंदगी जियो ऐसे कि मिसाल बन जाए!” असे उद्गार तिने काढले आणि त्याचे उदाहरण सादर करत तिने हा शो जिंकून घेतला. हिमानी दृष्टीहिन आहे, पण त्याची ही समस्या तिच्या स्वप्नांसमोर कधीच आली नाही, हिमानीने हे सिद्ध केलय.
अमिताभ बच्चन यांचा सर्वात लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ चा हा सीझन (13 वा) देखील प्रत्येक सीझन प्रमाणे खूप चर्चेत आहे. केबीसी 13 सुरू होऊन काही दिवस झाले आहेत आणि या शो ला पहिला करोडपतीही मिळाला आहे, ती सुद्धा एक महिला. ३१ ऑगस्ट रोजी, आग्राच्या हिमानी बुंदेला, एक शानदार खेळ खेळत, १ कोटी रुपये जिंकले, तिला ७ कोटींच्या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते, म्हणून तिने गेम सोडून १ कोटी रुपये घेऊन घरी परतली.
२५ वर्षाच्या हिमानी द्रष्टीहिन आहेत. १० वषापूर्वी एका रस्ते अपघातानंतर त्यांच्या डोळयांना गंभीर दुखापत झाली त्यांच्या डोळयावर ४ शस्त्रक्रिया झाल्या आहेत पण दृष्टी परतली नाही जीवनात अनेक संघर्ष चढ उतार आले पण हिमानीने कधीही हार मानली नाही. या प्रचंड आघातानंतरही हिमानीने धीर सोडला नाही आणि आपले जीवन मुलांना शिकवण्यासाठी वेचण्याचा निर्णय तिने घेतला. दिव्यांग लोकांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते, याची जाणीव ती मुलांना करून देते. स्वतः आनंदी राहून आनंद पसरवणे हे हिमानीचे ब्रीद आहे. त्यामुळे हिमानीच्या खेळाची चर्चा सर्वत्रच सुरू आहे.
७ कोटीचा हा प्रश्न होता, …
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समध्ये सादर केलेल्या प्रबंधाचं शीर्षक काय होतं? ज्यासाठी त्यांना १९२३ साली डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली?
A) द वॉण्ट्स अॅण्ड मीन्स ऑफ इंडिया
B) द प्रॉब्लेम ऑफ द रुपी
C) नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया
D) द लॉ अॅण्ड लॉयर्स
या प्रश्नाचं उत्तर होतं B – द प्रॉब्लेम ऑफ द रुपी. ह्याच प्रश्नाचं हिमानी यांना उत्तर देता आलं नाही त्यामुळे त्यांनी गेम क्वीट करत एक कोटी रुपयांची रक्कम आपल्या नावावर केली.प