खुटील आदीवासी बांधवांना जैन कुटूंबाकडून ऐन थंडीत मायेची उब
महाड – तालुक्यात पारा चांगलाच उतरला असून कडाक्याची थंडी पडू लागली आहे. या कडाक्याचा थंडीत खुटील आदीवासीवाडीवरील आदीवासी बांधवांना मायेची उब मिळाली आहे. महाडमधील व्यापारी जैन यांच्या कुटूंबाकडून खुटील आदीवासीवर ब्लॅंकेट्स वाटप करण्यात आले आहेत. येथील प्राथमिक शाळेतच हा कार्यक्रम पार पडला.
महाडमध्ये आता कडाक्याची थंडी पडू लागली आहे. तालुक्यातील ग्रामिण भागात याचे प्रमाण अधिक आहे. शहरातील किंवा ग्रामिण भागातील सधन कुटूंबाना ब्लॅंकेट्स किंवा स्वेटर सहज घेणे शक्य होते मात्र आदीवासी बांधवांना हे शक्य नसल्याने महाडमधील रत्नदिप ज्वेलर्सचे मालक जैन यांनी खुटील आदीवासीवाडीवर ब्लॅंकेट्स वाटप केले. शहरातील स्मार्ट स्टोअर्सचे मालक मुबीन अहमदखान देशमुख यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम खुटील याठिकाणी राबवण्यात आला. यावेळी बाबुलाल जैन, मिठालाल जैन, ऊमेश जैन, पत्रकार चंद्रकांत कोकणे, पत्रकार निलेश पवार, मुबीन अहमदखान देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उर्मिला देवजी जगताप, सुषमा देवजी जगताप, प्रा.शिक्षक माणिकलाल जगताप उपस्थित होते.