सुमारे चारशे गॅस सिलेंडरसह दहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
न्यायालयात आरोपींना हजर केले असता चार आरोपींना पोलीस कोठडी तर सहा आरोपींना जेल
बदलापुर : कुलगाव बदलापुर परिसरामध्ये घरगुती गॅस सिलिंडरची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती बदलापुर ग्रामीण पोलिसांना गुप्तबातमी दारांमार्फत मिळाली होती. मिलेलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून राहटोळी गावातील प्रकाश खोत यांच्या फार्महाऊसवर धडक कारवाई केली असता काही इसम घरगूती गॅस सिलेंडर मधील गॅस काढून, कॉम्प्रेसर पाईपचा वापर करून, घरगूती गॅस व्यवसायिक गॅस सिलेंडरमध्ये भरत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याअनुषंगाने बदलापुर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत दहा आरोपीना बेड्या ठोकल्या असून सुमारे चारशे गॅस सिलेंडर ताब्यात घेतले आहेत, तर यामध्ये सुमारे 32 लाख 20 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार आरोपींना पोलीस कोठडी तर सहा आरोपींना जेलची सजा सुनावण्यात आलीय.