गुजरात : गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासीक यश मिळवल. गुजरातचा गड भाजपने आपल्याकडे कायम राखला आहे. तर भाजपने हिमाचलची सत्ता गमावली गुजरातमध्ये दारूण पराभव झालेल्या काँग्रेसने हिमाचलमध्ये विजय मिळवला.

गुजरातमध्ये २७ वर्षे भाजप सत्तेत असून यंदाच्या निकालाने भाजपने १९८५ मधील काँग्रेसच्या माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखालील १४९ जागांचा विक्रम मोडीत काढला आहे. गुजरातने १५६ जागा जिंकून रेकॉर्डब्रेक केला आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ प्रचारसभा घेतल्या होत्या गुजरातमधील मोदींचा करिष्मा कायम राहिला आहे. गुजरातमध्ये काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या निवडणुकीत ७७ जागा जिंकलेल्या काँग्रेसला केवळ १७ जागांवर विजय मिळवता आला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावेळी भारत जोडो यात्रेला अधिक पसंती दिल्याने मोजक्याच प्रचार संभा घेतल्या होत्या. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला ५ जाग जिंकल्या. त्यामुळे आपला एक आकडी जागांवरच विजय मिळवता आला आहे.

हिमाचलमध्ये सत्ता बदलाची परंपरा कायम …

काँग्रेसने ४० जागा जिंकत हिमाचल प्रदेशची सत्ता भाजपकडून खेचून घेतली १९८५ पासून राज्यात प्रत्येक पाच वर्षात सत्ता बदल होत असल्याची पंरपरा यावेळीही कायम राहिली आहे. भाजपने २५ जागा जिंकलया तर अपक्ष तीन ठिकाणी विजयी झाले. आम आदमी पक्षानेही उमेदवार उभे केले होते पण ापने अधिक लक्ष गुजरातकडे दिल्याने त्याचा लाभ काँग्रेसला मिळाला आहे. मात्र गुजरातमध्ये आप मुळेच काँग्रेसला फटका बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने एक लाख नोक-या जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे आणि महिलांना दीड हजार रूपयांचा दरमहा भत्ता दिला जाईल अशा तीन घेाषणा केली होती.

गुजरात
भाजप १५६
काँग्रेस १७
आप ०५
हिमाचल प्रदेश
काँग्रेस ४०
भाजप २५
आप – ००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!