मुंबई : भाजपच्या टीव्ही व सिने कामगार संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाग्येश अंकुश डोंगरे यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात युवा सेना राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्यासमवेत मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

डोंगरे यांनी भाजपच्या हिंदी व सिने युनियनमार्फत आतापर्यंत अनेक आंदोलने केली होती. त्यांच्या अनेक आंदोलनाची दखल घेण्यात त्यांनी प्रशासनाला भाग पाडले आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे चित्रपट सेनेला मोठी भरारी मिळेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!