डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांचा प्रश्न चांगलाच तापला आहे. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी यावरून प्रशासनाला धारेवर धरले असतानाच, आज भाजपच्या रणरागिणी थेट रस्त्यावर उतरल्या. डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ठाकुर्ली पुलावरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याने मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. भाजपच्या महिला कार्यकत्यांनी पुलावरील खड्डे बुजवून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. कालच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी रस्त्यांसाठी ३६०.६४ कोटी मंजूर केल्याची माहिती दिली आहे. मात्र गणेशोत्सव तोंडावर आल्याने निधी येणार कधी आणि रस्ते दुरूस्त होतील कधी ? असा सवाल कल्याण डेांबिवलीकरांमध्ये उपस्थित होत आहे.
यंदाच्या पावसात कल्याण डोंबिवलीतील सर्वच रस्त्यांची वाट लागली असून जागोजागी खड्डे पडलेत, ठाकुर्ली पुलानजीकच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे पुलावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्योन वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तसेच खड्डयात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकांना खड्डयाचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची भिती आहे यापूर्वी खड्डयांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे मात्र प्रशासन ढिम्म असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त हेात आहे आठवडाभरापूर्वी पावसाने देऊन देखील प्रशासनाकडून पुलावरील खड्डे बुजवण्यात न आल्याने आज डोंबिवली पूर्व भाजप महिला मोर्चा अध्यक्षा पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या कार्यकत्यांनी रस्त्यावर उतरून मातीचा भराव टाकून खड्डे बुजवत प्रशासनाचा निषेध नोंदवला . या आंदोलनात 75 वर्षांच्या आजी देखील सहभागी झाल्या होत्या, आम्ही पालिकेला कर भरतो तर मग हा कर जातो कुठे ? असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत असल्याचेही पाटील यांनी केला. प्रशासनाकडून तातडीने रस्ते दुरुस्तीच्या कामांना व खड्डे न भरल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिला आघाडीच्यावतीने देण्यात आला.