भिवंडीत फेरनिवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी
भिवंडी : भिवंडी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तीन गणामध्ये झालेल्या फेरनिवडणुकीत  भाजपने वर्चस्व मिळवले आहे. ठाणे जिल्हा परिषद  38 शेलार गणातून अरुण भोईर, पंचायत समिती 75 शेलार  गणातून अवती भोईर तर पंचायत समिती 76 कोलीवली  गणातून  गंगाराम उगले  हे  भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झालेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी 13 डिसेंबरला मतमोजणी पार पडली होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने या तीन गणाचे मतदान रद्द ठरवीत पुनर्मतदान घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार 26 डिसेंबरला मतदान होऊन आज मतमोजणी पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!