मुंबई: भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक समन्वय आघाडीची प्रदेश कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. कोकण संयोजक पदी ह.भ. प. मोहन महाराज म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.
प्रदेश सहसंयोजकपदी प्रकाश महाराज जवंजाळ, राजेश देगलूरकर, संजयनाना धोंडगे, संजय जोशी, शिल्पा देशकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभाग संयोजकपदी रामराव शेळके, बबनराव मुठे, संजय घुंडरे पाटील, सुरेशचंद्र गुप्ता, मीनाताई पाठक, मोहन म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रेखाताई कुलकर्णी यांची देवस्थान समन्वयकपदी, अमित धाडगे यांची धर्माचार्य समन्वयकपदी, महानुभाव समन्वयकपदी महंत केशराज बाबा महानुभाव आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. बाबासो खारतोडे, महेंद्र महाराज म्हस्के आदींची सहसमन्वयक पदी नियुक्ती करण्यात आहे. डॉ. अजय संखे, आचार्य मनिषभाई महाराज, शक्ती महाराज, डॉ.राजेंद्र दवंडे आदींची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.