भाजपच्या रोजगार मेळाव्यात अंध महिलेला मिळाला रोजगार
डोंबिवली (शंकर जाधव) : `आमुचा तरुणाला रोजगार देण्याचा `या संकल्पनेतून भाजप नगरसेवक विनोद काळण यांनी बेरोजगार हटाव मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत रविवार ११ फेब्रुवारी रोजी डोंबिवली पूर्वेकडील आजदेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रोजगार मेळाव्यात शुभांगी वाघ या अंध महिलेला रोजगार मिळाला. अश्या रोजगाराची अंध , अपंग व्यक्तींना आवश्यकता असल्याचे वाघ यांनी सांगितले. या मेळाव्यात अनेक तरुणांना रोजगार मिळण्याने त्यांनी नगरसेवक विनोद काळण यांचे आभार मानले.
राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आजदेपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक साई शेलार यांनी या मेळाव्याला भेट देऊन स्थानिक नगरसेवक विनोद काळण यांचे कौतुक केले.या मेळाव्यात बेरोजगार तरुणांना असिक्स बॅक,आयसीआय बॅक,एलआयसी , छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एयरपोर्ट , हिंदुस्तान टाईम्स,डीएनएआणि क्रेस्टल या कंपनीत नोकरी मिळाली.
या मेळाव्यात रोजगारासाठी आलेली येथील स्थानिक रहिवाशी अंध महिला शुभांगी वाघ यांना एका कंपनीत नोकरी मिळाली.यावेळी वाघ यांनी भाजपने रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे डोंबिवली अध्यक्ष मिहीर देसाई यांनी या रोजगार मेळाव्याला भेट देत अश्या मेळाव्यामुळे तरुणांनी रोजगाराची संधी लवकर मिळते असे सांगितले. नगरसेवक काळण म्हणाले, आजची तरुणपिढी सुशिक्षित असली तरी नोकरी मिळणे अवघड झाले आहे. अश्या वेळी भाजप या तरुणवर्गाच्या पाठीशी उभी आहे. राज्यातील , शहरातील आणि ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला रोजगार मिळावा म्हणून भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहे.या रोजगार मेळाव्यात असंख्य तरुणांनी गर्दी केली होती.