अदृश्य हात सरकारच्या पाठीशी  मुख्यमंत्रयानी दाखवून दिलं

भाजपचे प्रसाद लाड विधानपरिषद निवडणुकीत विजयी

मुंबई : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड हे अपेक्षेप्रमाणं विजयी झालेत. लाड यांना २०९ मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दिलीप माने यांना ७३ मते मिळाली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची तब्बल १५ मतं फुटल्याची चर्चा आहे. सरकारच्या मागे अनेक अदृश्य हात आहेत. शिवसेनेच्या पाठींब्याशिवाय सरकार टिकू शकतो सरकारला कोणताच धोका नाही हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीतून शिवसेनेला दाखवून दिलं.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी गुरुवारी पोटनिवडणूक पार पडली. भाजपतर्फे प्रसाद लाड रिंगणात होते. तर काँग्रेसने दिलीप माने यांना उमेदवारी दिली होती. माजी मुख्यमंत्री नारायण राणे समर्थक दोन आमदारांची मते भाजपला मिळाली. नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांनी भाजपच्या पारड्यात मत टाकल्याचा अंदाज आहे. या निवडणूकीत एकुण 284 आमदारांनी मतदान केले. एकुण 288 सदस्यांपैकी एम आय एम पक्षाचे वारिस पठाण आणि इम्तियाझ शेख हे दोन सदस्य मतदानास अनुपस्थित होते. सदस्य छगन भुजबळ हे उपस्थित राहू शकले नाहीततर राज्यमंत्री अर्जून खोतकर यांना न्यायालयाच्या निर्देशांनुसार मतदान करता आले नाही.

काँग्रेस – राष्ट्रवादीची मतं फुटली

विरोधकांकडं काँग्रेस ४२, राष्ट्रवादी ४०, शेकाप ३, समाजवादी पक्ष १, माकप १, भारिप १ अशी ८८ मते होती. मात्र, मानेंना केवळ ७३ मते मिळाली. याचाच अर्थ संख्याबळापेक्षा त्यांना १५ मतं कमी पडली.

लाड यांना १५ मतं जादा
सत्ताधाऱ्यांकडं भाजप १२२, शिवसेनेची ६२, बहुजन विकास आघाडी ३ आणि अपक्ष ७ अशी १९४ मतं होती. मात्र, लाड यांना २०९ मतं मिळाली

शिवसेनेलाही चपराक
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना विधानसभेतील २०७ मते मिळाली होती. यावेळी त्यामध्ये आणखी दोन मतांची भर पडली. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा हादरा असल्याचे बोलले जाते. मात्र या निवडणुकीमुळे सरकारचा पाठींबा काढणार अशी वल्गना करणा-या शिवसेनेलाही चांगलीच चपराक बसलीय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!