डोंबिवली ;  गेल्या काही महिन्यपासून मनसे- भाजप युती ची चर्चा रंगली आहे. यावर मनसे – भाजपचे  ज्येष्ठ नेते काही वक्तव्य करत नसले तरी मनसे भाजपची वाढलेली जवळीक युतीचे संकेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.  मनसेच्या डोंबिवली शहर मध्यवर्ती शहर शाखेचे आज मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाला  चक्क भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे केडीएमसी च्या आगामी नी निवडणूकीत मनसे- भाजप युती होणार असेच दिसून येत आहे. 

लसीकरण ही सरकारची जबाबदारी : शर्मिला ठाकरे


मनसेच्या डोंबिवली शहर मध्यवर्ती शहर शाखेचे आज शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर पत्रकाराशी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की,  आपण अनेक दुर्धर आजरा सोबत जगतोय , कोरोनामुळे जग बंद करणार का ? असा सवाल केला पूढे बोलताना त्यांनी युद्ध पातळीवर लसीकरण पूर्ण केलं पाहिजे ,लसिंचे दोन डोस बंधनकारक करता तर लसीकरण ही जबाबदरी सरकारची आहे असा टोला लगावला


 भाजप आमदाराच्या उपस्थिती बद्दल राजू पाटील म्हणतात 
 

याबाबत मनसे आमदार राजू पाटील म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे निर्णय होईल असं सांगत  भाजप आमदाराच्या उपस्थितीची विषयाला बगल दिली,  आम्ही निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर कार्यलयाचे उदघाटन केलंय आम्ही ताकाला जाऊन भांडे लपवत नसल्याचे स्पष्ट केलं

कोरोना नियमांची पायमल्ली


मध्यवर्ती कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमाला कार्यकर्त्यानी एकच गर्दी केली,  चुकून कुणी तरी मास्क घातल्याच दिसून आलं ,कोरोना नियमांची अक्षरशः पायमल्ली झाल्याचे या कार्यक्रमात दिसून आले त्यामुळे नियम फक्त सर्वसामान्यांना का ? असा सवाल उपस्थित होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *