भाजपचे एकच लक्ष ; शिवसेना- मनसेच्या सभांमधील गर्दीचे मोडायचे रेकॉर्ड !
मुंबई : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील बीकेसी मैदानावर महामेळावा होत आहे. अवघ्या काही मिनिटात महामेळाव्याला सुरुवात होणार आहे. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मुंबईत भाजपचे शक्ती प्रदर्शन असले,  तरीसुद्धा शिवसेनेचा शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा आणि मनसेचा गुढीपाडवा मेळावा या सभांमधील गर्दीचे विक्रम मोडायचे आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे कालच मुंबईत दाखल झाले आहेत. या मेळाव्यासाठी राज्यभरातून सुमारे ५ लाख कार्यकर्ते उपस्थीत राहणार असल्याचे बोलले जातंय. रेल्वे, खाजगी वाहने, बस मधून लाखो कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत. त्यामुळं मुंबईकरांना प्रचंड वाहतूक कोंडीचा ही सामना करावा लागतोय. वाहतूक विभागाच्या वतीने वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *