मुंबई : मोदी मंत्रीमंडळातील नव्या केंद्रीय मंत्रयाची महाराष्ट्रात आजपासून जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली, मात्र या तीन मंत्रयाच्या जनआशीर्वाद यात्रेतील तीन घटनांनी ही यात्रा चांगलीच चर्चेत आलीय. मराठवाडयातून भागवत कराड, ठाणे कल्याणातून कपील पाटील आणि पालघरमधून डॉ भारती पवार यांची जनआशीर्वाद यात्रेची सुरूवात झाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे १९ ऑगस्टपासून जनआशीर्वाद यात्रा काढणाार आहेत. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून निघणार आहे. मात्र आजच्या जनआशीर्वाद यात्रेत तिन्ही मंत्रयाच्या यात्रा चर्चेत सापडल्या आहेत.
घटना पहिली …
आज सकाळी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचले. त्याठिकाणी कार्यकत्यांची गर्दी जमली होती. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. भाजपची यात्रा सुरू होण्यापूर्वीच भागवत कराड यांना मुंडेंच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. . पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है अशी कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र त्यावेळी पंकजा मुंडे कार्यकत्यांवर चांगल्याच संतापल्या. काय अंगार-भंगार घोषणा लावलीय, दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरू आहे का? मला शोभत नाही हे वागणं. माझ्या उंचीची लायकी ठेवा नाहीतर यायचं नाही मला भेटायला.” अशा शब्दात पंकजा यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.
घटना दुसरी ….
भाजप शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर आता भाजप मनसेची जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेत्यांच्या आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी चांगल्या वाढल्या आहेत. भाजप व मनसे युतीवर अजूनही नेतेमंडळी वक्तव्य करीत नसले तरी भाजप आणि मनसेच्या नेत्यांची जवळकी वाढली आहे कालच मनसेच्या डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी हजेरी लावली होती आज केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी मनसेचे आमदार राजू पाटील हे उपस्थित होते. जनआशिर्वाद यात्रेच्या गाडीवरच आमदार पाटील विराजमान झाले होते. त्यामुळे भाजप मनसेची जवळीक हे युतीचे संकेत देत असल्याचे दिसून येत आहे. तसेच पाटील यांच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी तुफान गर्दी केली होती यावेळी ढोल ताशांच्या गजरात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
घटना तिसरी ……
पालघर येथून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली. मनोर येथे आदिवासींनी त्यांच्या स्वागतासाठी लोकनृत्य सादर केले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनीही लोकनृत्यावर ठेका धरला. त्यानंतर एका आदिवासी युवकाच्या चहाच्या टपरीवर डॉ.पवार यांनी चहाचा आस्वाद घेतला. त्या युवकाशी त्यांनी यावेळी संवाद साधला. पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. मात्र आजही आदिवासी अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांनी आज आदिवासी बांधावांसोबत संवाद साधला, त्यांच्या व्यथा समजावून घेतल्या त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिलं. त्यामुळे आदिवासींचे अच्छे दिन येणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.