मुंबई : एकिकडे भाजपला केंद्रातील सत्तेतून खाली खेचण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक येत्या २३ जून रोजी पाटणा येथे होत असतानाच दुसरीकडे भाजप मिशन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख जाहीर केले आहेत. भाजप- शिवसेना (बाळासाहेबांची) युतीने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला असल्याचे बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
२०२४ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपनेही लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर करून दोन्ही निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. यावेळी बावनकुळे यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीने नियुक्त केलेले निवडणूक प्रमुख भाजपा बरोबरच शिवसेनेच्या उमेदवारांनाही सहकार्य करणार आहेत. आगामी सर्व निवडणुका युतीत लढविणार असल्याने आमचे निवडणूक प्रमुख शिवसेनेसाठीही काम करणार आहेत.
१० जूनला अमित शहांची नांदेडमध्ये सभा
मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे सध्या सुरु असलेल्या महाजनसंपर्क अभियानात नांदेड येथे १० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही राज्यात सभा होणार आहे. या अभियानात मोदी सरकारची कामगिरी सामान्य माणसापर्यंत पोहचविली जाणार आहे. या अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. या अभियानात घरोघरी जाऊन मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरित केली जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून ३ कोटी कुटुंबांपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत असे बावनकुळे यांनी सांगितले.
हे आहेत लोकसभा निवडणूक प्रमुख …
मुंबई उत्तर – योगेश सागर
मुंबई उत्तर पश्चिम – अमित साटम
मुंबई उत्तर पूर्व – भालचंद्र शिरसाट
मुंबई उत्तर मध्य – पराग अळवणी
मुंबई दक्षिण मध्य – प्रसाद लाड
मुंबई दक्षिण – मंगलप्रभात लोढा
ठाणे – विनय सहस्रबुद्धे
भिवंडी : मधुकर मोहपे
कल्याण : शशीकांत कांबळे
पालघर : नंदकुमार पाटील
मावळ – प्रशांत ठाकूर
रायगड : सतीश धारप
रत्नागिरी- सिंधुदुर्ग – प्रमोद जठार
कोल्हापूर – धनंजय महाडिक
हातकणंगले – सत्यजीत देशमुख
सांगली – दीपक शिंदे
सातारा – अतुल भोसले
सोलापूर – विक्रम देशमुख
माढा- प्रशांत परिचारक
धाराशीव : नितीन काळे
लातूर : दिलीप देशमुख
बीड : राजेंद्र मस्के
नांदेड : व्यंकटजी गोजेगावकर
शिर्डी : राजेंद्र गोंदकर
रावेर : नंदु महाजन
जालना – विजय औताडे
लातूर – दिलीप देशमुख
छत्रपती संभाजीनगर – समीर राजूरकर
रामटेक : अरविंद गजभिये
दिंडोरी – बाळासाहेब सानप
वर्धा – सुमीत वानखेडे
पुणे – मुरलीधर मोहोळ
बारामती – राहुल कुल
शिरुर – महेश लांडगे
विधानसभा निवडणूक प्रमुख
कल्याण पश्चिम : नरेंद्र पवार
मुरबाड : उल्हास बांगर
अंबरनाथ : गुलाबराव करंजुले
उल्हासनगर : जमनुदास पुरस्वानी
कल्याण पूर्व : संजय मोरे
डोंबिवली : प्रज्ञेश प्रभुघाटे
कल्याण ग्रामीण : नंदु परब
मीरा भाईंदर : रवी व्यास
ओवळा माजीवडा : मनोहर डुंभरे
कोपर पाचपाखाडी : निरंजन डावखरे
ठाणे : अँड सुभाष काळे
मुंब्रा कळवा : संजीव नाईक
ऐरोली : सागर नाईक
बेलापूर : निलेश म्हात्रे
बोरीवली : सुरेद्र गुप्ता
मागाठाणे : प्रवीण दरेकर
दहिसर : श्रीकांत पांडे
शिवडी शलाका साळवी
भायखळा : रोहीदास लोखंडे
वरळी : दिपक पाटील
पनवेल नितीन पाटील
कर्जत किरण ठाकरे
महाड : बिपीन महामुणकर
अलिबाग : छोटम भोईर