डोंबिवली : बिश्नोई गैंगच्या नावाने डोंबिवलीतील एका बांधकाम व्यावसायिकला धमकी देणा-या दोघांना सापळा रचून रामनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. आकाश रमेश गिरी (वय २३. रा. तांबोळी नगर, डोंबिवली पूर्व) इंद्रजित राजाराम यादव (वय ३० वर्षे रा. धनश्री चाळ, पिसवली, कल्याण पूर्व ) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

डोंबिवलीत प्रशांत विठ्ठल जाधव नामक बांधकाम व्यवसायिकाला दि १३ ऑक्टोबरला रात्री बाराच्या सुमारास बिश्नोई गैंगचा शूटर आकाश गिरी या नावाने फोन केला. तु इंद्रजित यादव याचे पैसे त्याला दे, नाहीतर तुझी मर्डर करतो अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. बिश्नोई गैंगच नाव असल्याने रामनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत आकाश रमेश गिरी व इंद्रजित राजाराम यादव दोन्ही आरोपींना बेडया ठोकत त्यांच्याकडे चौकशी केली असता इंद्रजीत यादव हा त्या विकासाकडे काम करत असून त्याचे काही पैसे बांधकाम व्यावसायिक प्रशांत विठ्ठल जाधव याच्याकडे बाकी होते वारंवार मागून तो देत नसल्याने अखेर त्याने याची माहिती आपल्या मित्र आकाश रमेश गिरी याला दिली व त्यानंतर आकाशने विठ्ठलला धमकवण्यासाठी स्वतःला बिश्नोई गैंगचा शूटर असल्याचे सांगितले होते सध्या या प्रकरणी रामनगर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!