सायकल संमेलानाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
डोंबिवली – डोंबिवलीत भलेल्या पहिल्या सायकल संमेलनाचे उद्घाटन स्थानिक आमदार तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज सकाळी पार पडले.तसेच सावित्रीबाई फुले नाट्यगृहात सायकल फोटोग्राफी एक्सिबिशन पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी मोठी गर्दी केली आहे.
क्रीडा भारती, डोंबिवली सायकल क्लब, नॅशनल युथ ऑर्गनायझेशन आणि वाहतूक पोलिसांच्या वतीनं सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हे संमेलन पार पडणार असून महाराष्ट्र मधील विविध ठिकाणाहून लोक या संमेलनात सामील झाले आहेत. या संमेलनाच्या सुरवातीला जनजागृतीसाठी आज डोंबिवलीत सायकल रॅली काढण्यात आली . ही रॅली निघाली, ज्यात अनेक सायकलस्वार सहभागी झाले होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच या रॅलीत उत्साहानं सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यात अनेक वेगवेगळ्या आणि अनोख्या सायकलसहि डोंबिवलीकरांना पाहायला मिळाल्या.त्या सायकल रेलीत 80 वर्षाचे जेष्ठ सायकालिस्ट गोविंद परांजपे हे सांगली वरून आले आहेत तर 76 वर्षाचे श्यामसुंदर केसरकर हे ठाणे वरून आले आहेत आणि 90 वर्षांचे डी.व्ही. भाटे हे ठाणे वरून आले आहेत.
Zakkas Dombivli information & News