डोंबिवली :– डोंबिवली स्टेशन परिसरात सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले असून आज या कामाचे भूमीपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडले. या सुशोभीकरण अंतर्गत डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या आठही प्रवेशद्वार सुशोभीकरण करण्यात येणार आहे. डोंबिवलीतील साहित्य, खेळाडू, कलाकार यांची माहिती, सुबक रंगरंगोटी आणि स्टेशन परिसरातील रस्त्यांचा काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसराचा कायापालट होणार आहे असे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसराच्या सुशोभिकरणासाठी आठ कोटी रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी अभावी हे काम अडीच वर्षापासून रखडले होते. मात्र राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर यासाठी निधी मंजूर करण्यात आला त्यामुळे आज कामाचे भूमिपुजन करण्यात आल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, डोंबिवली शहर वाढतेय. या शहराला चांगलं आणि देखणं रूप आलं पाहिजे या हेतूने स्टेशन परिसराचे सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी आठ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन अडीच वर्षापूर्वी निधी अभावी हे काम रखडले होते. मात्र राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थानापन्न होताच निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचे भूमिपूजन करण्यात आल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. तसेच डोंबिवलीची सांस्कृतिक, साहित्यिक, कलाकारांची ,खेळाडूंची नगरी ही ओळख या माध्यमातून करून दिली जाणार आहे. येत्या काही महिन्यातच डोंबिवली स्टेशन परिसराचा कायापालट होईल असे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक विकास म्हात्रे, राहुल दामले, शैलेश धात्रक, मंदार हळबे, मनीषा धात्रक, पप्पू म्हात्रे,समीर चिटणीस, शशिकांत कांबळे, आदी पदाधकारी उपस्थित होते.