भिवंडीकर संघर्ष समितीचा दणका : खड्डे भरण्याच्या कामाला युध्द पातळीवर सुरूवात

 सिटीझन जर्नालिस्ट ने सर्वात प्रथम बातमी केली होती व्हायरल
भिवंडी – महानगर पालिकेच्या नाकर्तेपणामुळे शहरात सर्वच रोडवर खड्डे , कचऱ्याचे ढिग , नागरिकांचे आरोग्य धोक्यात , पाण्याची समस्या कायम या सर्व बाबीची दखल भिवंडी कर संघर्ष समितीचे अध्यक्ष सुहास बोंडे यांनी घेऊन सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मंडई पासून महापालिका मुख्य कार्यालय पर्यंत भिक मांगो आंदोलन केले आणि भिक मागून जमा केलेला निधी महापालिका अधिकाऱ्यांना दिला असता त्यांनी निधी नाकारला मात्र समितीने हा निधी थेट प्रांताधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला या आंदोलनात संघर्ष समितीचे अध्यक्ष सुहास बोंडे,धनपाल देशमुख,मोहन वल्लाळ,नारायण जाधव,अरहम फारुकी,पुनमताई बोंडे,रोमा निलेश आळशी,वृषाली कोंडलेकर,आर्शी बोंडे,संजय चव्हाण,आर.ए.मिश्रा आदींसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते , त्यामुळे महानगर पालिकेची चांगलीच नाचक्की झाली , त्यामुळे खडबडून जागे झालेले मनपा आयुक्त यांनी खड्डे बुजवण्याचे आदेश दिले त्यामुळे शिवाजी चौकापासून खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे , खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला असून नागरिकांनी भिवंडीकर संघर्ष समिती आणि अध्यक्ष सुहास बोंडे यांचे आभार मानून अशाच पद्धतीने भिवंडीच्या समस्या साठी पुढाकार घ्या असे आवाहन करून भिवंडी कर तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचे आश्वासन दिले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *