भिवंडीत नवरीची करवल्यांसह बुलेटवरून एंट्री ; वऱ्हाडी मंडळी  आश्चर्यचकित  : व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

भिवंडी ; बहुचर्चित सैराट चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू ( आर्ची ) हिची कॉलेजमध्ये बुलेटवरील एंट्री खूपच चर्चेचा विषय ठरली आहे.तेव्हापासून गावखेड्यातील मुलींनाही बुलेटचे आकर्षण वाढले असून भिवंडी तालुक्यातील आमणे गावात स्वत:च्याच लग्न मंडपात नवरीने करवल्यांसह बुलटेवरुन एंट्री केल्यामुळे नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी आश्चर्यचकित झाली. या नवरीचा बुलेटवरील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

भिवंडी तालुक्यातील आमणे गावात सोमवारी स्वत:च्याच लग्न मंडपात नवरीने करवल्यासह बुलटेवरुन एंट्री केली. प्रणाली विश्वजित केणे  असे या नवरीचे नाव असून तिच्या सोबत चैताली विजय खुटले  व आशिकी किरण पाटील या  करवाल्यां होत्या. प्रणाली सहा वर्षापासून दुचाकी चालवत आहे. तीने बी.कॉमपर्यंत शिक्षण पूर्ण करून बँकींग डिग्री प्राप्त केली आहे. प्रणाली शालेय शिक्षण घेत होती तेव्हापासूनच तिला दुचाकी चालवण्याची आवड आहे असे तीचे मामा जोगेन पाटील यांनी सांगितले. कल्याण येथे महाविद्यालयात शिकत असताना ती बुलेटवरच जायची.शिवाय हौसेखातर फिरण्यासाठी ती बुलेटवरुनच जात असे.ही बुलेट प्रणाली हिला  तिचा भाऊ विशाल याच्याकडून रक्षा बंधनाची भेट म्हणून देण्यात आली आहे. प्रणाली हिचे लग्न ठाणे ,कोपरी येथील योगेश संदीप भोईर या इंजिनियर तरुणाशी ठरल्याने काल सायंकाळी लग्न समारंभ धुमधडाक्यात पार पडले. लग्नाची वेळ ६ .२० वा.असल्याने भटजीने मंगलाष्टकांना सुरुवात केली. वऱ्हाडींसह पै – पाहुण्यांच्या नजरा नवरीच्या आगमनाकडे वळल्या, मात्र यावेळी प्रणाली हिने पती योगेश याच्यासह वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठी बुलेटवरून एंट्री केली.हे दृश्य पाहून सर्वच पाहुणे अवाक झाले.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *