भिवंडीत घरगुती गॅस सिलिंडरची गळती : तिघेजण जखमी दीड वर्षाच्या मुलाचा समावेश 

भिवंडी : येथील बालाजीनगर भंडारी कंपाऊंड येथील चाळीतील एका कुटुंबात गॅस सिलिंडरची गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला व दिड वर्षाचा बालक भाजले आहेत. पत्नी धनलक्ष्मी दिड वर्षिय मुलगा बलराज जाऊ लक्ष्मी हे तिघे जखमी झाले आहेत.

व्यंकटराव कोलुकोला हे पत्नी व दिड वर्षिय मुलासह राहतात. शनिवार त्यांच्या घरी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा गॅस सिलेंडर जोडणी करून गेला होता. सायंकाळी 7.30 च्या सुमारास धनलक्ष्मी यांनी गॅस पेटवला असता भडका होऊन आग लागली . यावेळी त्यांच्या सोबत त्यांची जाऊ लक्ष्मी होती. हा प्रकार घडल्यानंतर दोघीही घराबाहेर पळल्या. त्यावेळी बलराज हा लहानगा रडू लागला. तो घरात एकटाच राहिल्याचे दोघींच्या लक्षात येताच त्यांनी घरात धाव घेऊन बलराज ला बाहेर काढले. यावेळी लक्ष्मी हिने रेग्युलेटवर पाणी टाकून आग विझवली. या आगीत लहान मुल 30 टक्के तर महिला किरकोळ भाजल्या आहेत. या दुर्घटने नंतर लागलीच शेजा-यांनी तिघा जखमींना स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांच्या वर प्रथोमोपच्चार करुन तिघांना उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!