भिवंडीचे तहसील कार्यालय बनले हाणामारीचा आखाडा ! 

नायब तहसीलदार संदीप आवारींच्या मुजोरीविरोधात भिवंडीकर एकवटले : सखोल चौकशीची मागणी

भिवंडी  : तहसील कार्यालय म्हणजे गोरगरीब शेतकरी सामान्य नागरिकांना न्याय देण्याचं ठिकाण. पण गेल्या काही महिन्यांपासून भिवंडी तहसील कार्यालया चांगलच वादात सापडलय. दादागिरी, गुंडगिरी, बेबंदशाही लाचखोरी आदीने कळस गाठल्याने तहसील कार्यालय हे हाणामारीचा आखाडा बनला असून, दलालांचा विळखा असल्याने गोरगरीब शेतक- यांची आर्थिक लूटमार होत आहे. नायब तहसीलदार संदीप आवारी हे यामागील सूत्रधार असल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास चे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. त्यामुळे आवारे हे चांगलेच वादात सापडले असून कारवाई न झाल्यास आमरण उपोषण बसण्याचा इशाराही जाधव यांनी दिलाय.

भिवंडी शहर हे अति संवेदनशील असून येथे विविध जाती धर्माचे लोक राहत आहेत. नायब तहसीलदार आवारी यांनी तहसील कार्यालयात काही खासगी कर्मचारी ठेवले आहेत त्या व्यक्तींमार्फत गेल्यानंतरच कोणतंही काम होतं. अन्यथा आवारी यांच्याकडून विनाकारण गोरगरीब शेतक- यांची कामे अडवून ठेवली जात आहेत. त्यांना एका किरकोळ कामासाठी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. तसेच खासगी कर्मचारी हे शासकीय ऐवज हाताळीत आहेत. त्यामुळे त्यांचा दुरूपयोग होण्याची शक्यता आहे. दलालांच्या विळयात तहसील कार्यालय अडकून पडले असल्याचे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. नायब तहसीलदार आवारी यांच्याविषयी अनेक तक्रारी आहेत लोकांशी उध्दटपणे वर्तन करीत असून त्यांनी नागरिकांना मारहाण केल्याच्याही तक्रारी आहेत. एका जबाबदार अधिका- याचे वर्तन हे अशोभनीय आहे. त्यामुळे आवारी यांची सखोल चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी निवेदनात केली आहे.तहसीलदारांना निवेदन देताना भ्रष्टाचार जन विरोधी आंदोलन न्यासचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर जाधव , भिवंडी अध्यक्ष मनोज खरे, भिवंडी शहर उपाध्यक्ष . अनिल पंडित, उल्हासनगर तालुका अध्यक्ष सारीपुत्र साळवे आणि अश्विनी कशिवले उपस्थित होते. यासंदर्भात नायब तहसीलदार संदीप आवारी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ न शकल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

गरीब महिलेलाही मारहाण ..
31 ऑक्टोबर 2018 रोजी अश्विनी अशोक काशिवले नावाच्या महिलेने आपल्या मुलीच्या दाखल्या विषयी चौकशी केली असताना कार्यालयातील कविता जोशी या महिला कर्मचाऱ्याने त्यांच्याशी उद्धटपणे वर्तणूक करून शिवीगाळ करीत कार्यालयातच मारहाण केली आहे. त्यामुळे तहसीदार कार्यालयाला हाणामारी च्या आखाड्याचे स्वरूप आले आहे , डिजिटल सिग्नीचर सारखी महत्वाची बाब ही खाजगी दलालांच्या माध्यमातून आवारी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. सचिन कुंभार आणि इतर दलाल हे त्यांची डीसी वापरतात. तसेच त्यांची डीसी ही खाजगी कार्यालयातून वापरली जात आहे , कोटरगेट येथील महा ई सेवा केंद्रातून खाजगी व्यक्तीच्या मार्फत वापरली जात आहे ,त्यामुळे स्वतःची , शासकीय जबादारी पाळण्यात व शासनाची गोपनीयता पाळण्यात असमर्थ असल्याने एवढ्या मोठ्या पदावर ठेवणे चुकीचे आहे ,जेव्हापासून आवारी यांनी पदभार घेतला आहे तेव्हा पासून खाजगी कर्मचारी , दलाल यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. विशेष म्हणजे कार्यालयातील सीसी टिव्ही कॅमेरे जाणूनबुजून बंद ठेवले आहेत, 18 जून 2017 रोजी विना परवाना रॉयल्टीची अवैध रेतीची गाडी एम एच क्र.04 इ बी 8038 पकडून तहसील कार्यालयात आणली होती , मात्र चिरिमिरी घेऊन 20 तारखेला गाडी सोडून दिली होती. मात्र आदिवासी महादेव कोळी सामाजिक संस्थेने ह्या प्रकरणी 22 तारखेला तक्रार करताच गाडी पावल्याची जुन्या तारखेची व जुन्या जावक क्रमांकाने पोलीस तक्रार दाखल करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असे अनेक प्रकरणं असल्याचे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.

गैरव्यवहाराचा कळस …
किरवली येथील शेतकरी कान्हू बजागे यांच्या एका प्रकरणात न्यायालयाचा स्टे असतानाही फेरफार मंजूर करून न्यायालयाचा अवमान तर केला त्यामुळे गरीब शेतकऱ्याची दोन एकर जमीन दुसऱ्याच्या नावावर करण्यासाठी लाखोंचा गैरव्यवहार करून शेतकऱ्यावरही अन्याय करीत आहे. त्याच प्रमाणे माहितीचा अधिकार हा पारदर्शक कारभारासाठी महत्वाचा अधिनियम आहे , मात्र भिवंडी तहसील कार्यालयातील माहितीच्या अधिकारांना जाणीवपूर्वक उत्तरे दिली जात नाही. अपील केल्यावर अपील सुनावणी घेतली जात नाही , तिसरे अपील करणे हे नागरिकांच्या दुष्टीने खर्चिक व वेळखाऊ सल्याने अनेक नागरिक तिसरे अपील करत नाही त्यामुळे वरिष्ठ पातळीवर ह्याची नोंद होत नाही त्यामुळे तहसील कार्यालयात अनेक अर्ज कार्यवाही शिवाय तसेच पडून आहे वेहळे गावातील शेतकरी बंडू पाटील यांच्या प्रकरणात नजराणा भरूनही त्याची कामे केली जात नाही पूर्ण दिवस वृद्ध शेतकऱ्यांना कार्यालयात 4 दिवस ताटकळत उभे ठेवले जात आहे. महापोली येथील शकील मुस्तफा पटेल यांच्या एक केसमध्ये नायब तसीलदार आवारी यांनी तर योग्य पुरेशी तारीख न देता 3 ते 4 महिन्यात केस संपवून टाकली त्यामुळे माझ्यावर अन्याय झालेला असून आवारी हे आपल्या पदाचा दुरुपयोग करत असल्याने त्यांच्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. श्रमजीवी संघटनेचे सुनील लोणे यांनी नायब तहसीलदार आवारी यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी तहसीलदार यांच्याकडे केल्या आहेत तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने लवकरच तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *