भिवंडीत शिवसेनेला धक्का : संपर्कप्रमुखांचा पुतण्या भाजपमध्ये दाखल 

भिवंडी : शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्कप्रमुख सुरेश उर्फ बाळ्या म्हात्रे यांचा पुतण्या व शिवसेनेचे युवा कार्यकर्ते गिरीश कृष्णा म्हात्रे यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला. भाजपचे ठाणे विभागीय अध्यक्ष व खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत गिरीश म्हात्रे यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.

गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत सुरू असलेल्या अंतर्गत व कुरघोडीच्या राजकारणाला आपण कंटाळलो होतो. तर दुसरीकडे भाजपचे खासदार कपिल पाटील यांची भिवंडी तालुक्यातील गावांच्या विकासाची भूमिका पसंतीला आली. त्यातून आपण भाजपकडे वळलो आहोत. भाजपच्या माध्यमातून गुंदवलीसह परिसराच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, अशी प्रतिक्रिया गिरीश म्हात्रे यांनी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. आता जिल्हा ग्रामीण संपर्कप्रमुखांच्याच पुतण्याने भाजपचा झेंडा खांद्यावर घेतल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. गिरीश म्हात्रे यांच्या भाजपप्रवेशामुळे जिल्हा परिषदेच्या पुर्णा गटात भाजपची स्थिती मजबूत झाली आहे.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!