भिवंडी- कल्याण- शीळ बायपासचे आता सहा पदरीकरण

एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत माहिती

कल्याण : भिवंडी़- कल्याण -शीळ बायपास रस्ता टप्पा क्र २ वगळून या रस्त्याचे आता सहा पदरीकरण करण्याचे शासनाने निश्चित केले असून, या मार्गाचे काम २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली. मात्र सहा पदरी रस्त्यामुळे जास्तीत जास्त लोक बाधित होतील त्यामुळे टप्पा क्र २ रस्ता करावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँगेसचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी केली. भिवंडी कल्याण शीळ मार्गावरील गोविंदवाडी बासपास टप्पा क्र २ च्या रखडलेल्या कामासंदर्भातचा तारांकित प्रश्न आमदार जगन्नाथ शिंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री शिंदे यांनी हे उत्तर दिलं.

भिवंडी कल्याण शीळ या गोविंदवाडी बायपास रस्त्याच्या कामांसदर्भात आमदार जगन्नाथ शिंदे व अॅड निरंजन डावखरे यांनी प्रश्न विचारला होता. शीळफाटा ते भिवंडी रस्त्याच्या लांबीतील नवीन सहा पदरीकरणाच्याकामासाठी प्रशासकीय मान्यता दिली असून, महामंडळामार्फत निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.  मात्र भिवंडी कल्याण शीळ मार्ग चार लेनचा असताना तो सहा लेनचा करताना कमीत कमी लोक बाधित होतील हे मंत्री महोदयांचे उत्तर संदीग्ध असल्याचेही आमदार शिंदे म्हणाले.
———–

एकूण बांधकाम खर्च २०२ कोटी रूपये असणार आहे 

महत्वाची कामांचा तपशील 

कामाचे नाव                                                 खर्च कोटीत

सहापदरी करणे                                                ७७. ७२

देसाई खाडीवरील दोन पुलांचे बांधकाम             ६ .३७

चार लहान पूल                                                   ३. २७

लोढा जंक्शन येथे दोन पदरी २ नवीन पूल           ३४. ३२

काटई रेल्वेवर दोन पदरी पूल जोडरस्त्यासह         ९. ९

पूत्रीपूल येथे दोन पूल                                             ४ .६५

————

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!