विद्यार्थ्यांच्या फन अॅन्ड फूड फेस्टिव्हला भिवंडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भिवंडी : विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जीवनातच व्यावसायिक क्षेत्राची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने पडघा येथील टी.ए.पाटील इग्लिश मिडियम स्कूलच्यावतीने फन अॅन्ड फूड फेस्टिव्हल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्टॉलवर विविध प्रकारचे खाद्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.या फन अँड फुड फेस्टिव्हलमध्ये पडघा परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.या फुड फेस्टिवलमध्ये विविध खाद्यपदार्थांच्या मेजवानीचा आस्वाद नागरिकांनी घेतला.या कार्यक्रमात १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून विविध खाद्य पदार्थांचे एकूण ५० स्टॉल लावले होते. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थी आणि त्यांना सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र थोरात तसेच विद्यार्थी,शिक्षक, स्कुल कमेटी सभासद,कर्मचारी उपस्थित होते. फूड फेस्टिवल यशस्वी होण्यासाठी शालेय कमेटी विभागाचे शिक्षण अध्यक्ष संजय पटेल ,शिक्षिका मनाली शेलार, शलाका गायकवाड, प्रतिक्षा मते आदींच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थांनी विविध खाद्य पदार्थ स्टॉलचे प्रदर्शन मांडले होते. याप्रसंगी शिक्षिका सविता कोथावदे यांच्या मार्गदर्शनाखाली गायन व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.