भिवंडीत मतदानाच्यावेळी शिवसेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
भिवंडी – जिल्हा परिषद निवडणुक मतदानादरम्यान आज भिवंडीतील काल्हेर गावात शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आपापसात भिडले. यावेळी बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. पोलिसांच्या समक्ष हा प्रकार घडला. पोलिसांनी सोडविण्याचे प्रयत्न केले मात्र कार्यकर्ते कोणालाच जुमानत नव्हते. अखेर पोलिसांनी लाठीमार करीत दोन्ही कार्यकर्त्यांना पिटाळून लावल्यानंतर जमाव पांगला. यानंतर भिवंडीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

सकाळपासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली. मात्र काल्हेर गावातील मतदान बुथवर भाजपचा कार्यकर्ता सारखा ये-जा करत असल्याने सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. मतदान केंद्राबाहेर ही हाणामारी झाल्याने गोंधळ पसरला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. जिल्हापरिषदेचे भिवंडीत २१, शहापुरात १४, मुरबाडमध्ये ८, कल्याणमध्ये ६ आणि अंबरनाथमध्ये ४ गट मिळून असे ५३ गट आहेत. भिवंडी तालुक्यात भाजपचे खासदार कपिल पाटील आणि शिवसेनेचे भिवंडी ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील तर मुरबाडमध्ये भाजप आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादीचे शहापुरातील आमदार पांडुरंग बरोरा, मुरबाडमध्ये सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार गोटीराम पवार यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!