नाशिकहुन भिवंडीत चालायचा वेश्या व्यवसाय : दलाल महिलेस अटक, दोन पिडीत महिलांची सुटका
भिवंडी ; महिलांना पैश्यांचे अमिश दाखवून त्यांना नाशिकहून भिवंडीत आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या एका महिलेस ठाणे अनैतिक मानवी वाहतूक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शुक्रवारी सायंकाळी रांजणोली बायपास नाका येथील फ्लोरा हॉटेलमध्ये सापळा लावून गजाआड केले आहे. पूनम उबाळे वय २३ रा. गांधीनगर , नाशिक रोड ) असे अटक केलेल्या वेश्याव्यवसाय दलाल महिलेचे नांव आहे. यावेळी पोलिसांनी दोन पिडीत महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. पूनम हि महिला नाशिक येथील गरीब महिलांना पैश्यांचे अमिश दाखवून त्यांना भिवंडीत आणून ग्राहकांकडून पैसे घेवून शरीर संबंधास भाग पाडत असल्याची खबर ठाणे अनैतिक मानवी वाहतूक गुन्हे शाखेला मिळाली होती.त्यानूसार पोलिसांनी फ्लोरा हॉटेलमध्ये सापळा लावला. त्यावेळी एसी रूममधील टेबल नं. ५२ आणि ५७ या टेबलांवर ग्राहकांशी दोन महिलांसोबत सौदेबाजी सुरु असताना पूनम हिला रंगेहात पकडण्यात आले.यावेळी पोलिसांनी १७ हजार किंमतीचे ३ मोबाईल व रोख ४ हजार ७९० रुपये असा २१ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून वेश्या दलाल पूनम हिच्याविरोधात पो.कॉ.सरस्वती आनंदा कांबळे यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय संतोष बोराटे करीत आहे.