भिवंडी -ठाणे महामार्गावरील बार आणि ढाब्यांमध्ये दारू विक्री जोरात : राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीसांचा कानाडोळा
भिवंडी – भिवंडी महामार्गालगत असलेल्या कशेळी ते अंजुरफाटा दरम्यान मोठया प्रमाणात ढाबे आणि बार असून या ठिकाणी बेकायदेशीरपणे खुलेआम दारूची विक्री केली जाते. मात्र राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. त्यामुळे बेजबाबदार अधिकारी आणि कायदा धाब्यावर बसणा-या ढाबा , बार चालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी समाजसेवक नागेश निमकर यांनी उत्पादन शुल्क आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे कारवाईची मागणी केली आहे .
ठाणे – भिवंडी जुन्या महामार्गावरील असलेल्या कोपर गावा सह काही गावात घरातून दिवस रात्र खुलेआम दारू विक्री केली जाते , कशेळी येथे दर्या किनारा ढाबा. क़ाल्हेर येथे फ सिद्धी ढाबा , जय मल्हार ढाब्यावर खुलेआम दारू विक्री केली जात आहे तसेच काल्हेर येथे सुकुर पेलेस , शिल्पा बार ,प्रसाद बियर शॉप ,उर्मिला बियर शॉप, पूर्णा येथे मोनिश बार , अथर्व हॉटेल ,रुचिता बार आदी बार आणि बहुसंख्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूची विक्री केली जात आहे त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे , मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने भिवंडीत उत्पादन शुल्क विभाग आहे की नाही असा सवाल येथील सुद्न्य नागरिक विचारत असून राज्य उत्पादन शुल्क आयुक्त पदी डॅशिंग समजल्या जाणाऱ्या अश्विनी जोशी यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यक्रत्ये नागेश निमकर यांनी लेखी निवेदन देऊन केली आहे ,